नमस्कार…
बाबासाहेब आंबेडकर एक विपुल लेखक, विद्वान आणि समाजसुधारक होते. त्यांनी त्यांच्या विचारांनी भारताच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात खोलवर छाप सोडली. जरी त्यांनी पारंपारिक आत्मचरित्र लिहिले नसले तरी, त्यांचे जीवन अनुभव, त्यांचे विचार यावर त्यांनी विस्तृत लेखन केलाय. ज्याला जोड मिळते ते त्यांच्या लेखांची आणि भाषणांची! त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांची प्रतिबिंब असलेली ती पुस्तके कोणती? ते पाहुयात. आता बाबासहेबांचं लिखाण अतिशय विस्तृत होत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या हयातीत लिहिलेल्या सर्व पुस्तकांबद्दल अगदी तपशीलवार सांगायचं झालं तर मोठा वेळ लागेल त्यामुळे महत्वपूर्ण पाच पुस्तकांबद्दल आपण जाणून घेऊयात.
पाहिलं पुस्तक आहे, “वेटिंग फॉर अ व्हिसा” हे आंबेडकरांचे सर्वात थेट आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे, फक्त २० पानांचे हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिले गेले होते. जे शोधले गेले आणि बाबासाहेबांच्या मरणोत्तर प्रकाशित झाले. हे शीर्षक सामाजिक स्वीकृती आणि समानता मिळविण्यासाठी आंबेडकरांना ज्या संघर्षांना तोंड द्यावे लागले त्याचे रूपकात्मक वर्णन करते. “वेटिंग फॉर अ व्हिसा” हे महत्त्वपूर्ण आहे कारण ते आंबेडकरांच्या भावनिक आणि वैयक्तिक अनुभवांची एक दुर्मिळ झलक देते.
दुसरं पुस्तक आहे, “Annihilation of Caste“. हे पुस्तक आंबेडकरांच्या बौद्धिक स्पष्टता आणि धैर्याचे प्रदर्शन करते, जे जातीवादाशी त्यांच्या झालेल्या थेट घटनांमुळे आकाराला येते. या पुस्तकात बाबासाहेबांच्या जीवनातील विशिष्ट घटनांबद्दल कमी आणि त्यांच्या जातीच्या मुळे त्यांना लढवय्या लागलेल्या वैचारिक लढ्याबद्दल जास्त आहे. ज्यातून बाबासाहेबांचे स्पष्ट आणि प्रगत विचार आपल्याला कळतात.
तिसरं पुस्तक आहे,“Who Were the Shudras?” या पुस्तकातून शूद्र जातीच्या उत्पत्तीला आव्हान देणारा ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय अभयासावर आधारित आहे. हे पुस्तक जातीय मिथकांचे उच्चाटन करण्याच्या बाबासाहेबांच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करते. हा दृष्टिकोन बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रवासाच्या प्रभावाखाली तयार झालेला आहे. यातून भारतीय इतिहासावर संशोधनवादी दृष्टिकोन निर्माण करण्यासही हातभार लावला आहे. जातिव्यवस्थेच्या पारंपारिक अर्थ लावण्यांना आणि सामाजिक स्तरीकरणाच्या उत्पत्तीला आव्हान दिले आहे. भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीत, विशेषतः जातिव्यवस्थेला आव्हान देण्यात आणि उपेक्षित समुदायांच्या हक्कांसाठी वकिली करण्यात आंबेडकरांचे हे कार्य प्रभावी राहिले आहे.
चौथं पुस्तक आहे The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables?” हे पुस्तक जातिव्यवस्थेवर एक प्रभावी टीका करत सामाजिक न्यायाची हाक देते. भारतातील अस्पृश्यतेच्या प्रथेला आकार देणाऱ्या ऐतिहासिक आणि सामाजिक शक्तींबद्दल यात भाष्य केले आहे. हे पुस्तक दलितांसाठी प्रतिष्ठा परत मिळवण्याच्या बाबासाहेबांच्या वचनबद्धतेवर भर देते, जे त्यांचे एक अविभाज्य ध्येय आहे.
पाचवं पुस्तक आहे “Buddha and His Dhamma” दलितांसाठी मुक्तीचा मार्ग म्हणून बौद्ध धर्माचे स्पष्टीकरण देणारे बाबासाहेबांचे हे अंतिम कार्य समजले जाते. हे पुस्तक त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला प्रतिबिंबित करते, ज्याचा शेवट १९५६ मध्ये बौद्ध धर्मात रूपांतरित झाल्यानंतर झाला. हे पुस्तक त्यांच्या वैयक्तिक आणि वैचारिक उत्क्रांतीचा प्रवास दर्शवते. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आत्मचरित्राचे तत्वज्ञानाशी मिश्रण करते.
या पाच महत्वाच्या पुस्तकांसोबतच Castes in India: Their Mechanism, Genesis and Development, The Problem of the Rupee: its origin and its solution, Bahishkrut Bharat, Federation Versus Freedom, Thoughts on Pakistan, Ranade, Gandhi and Jinnah, Mr. Gandhi and Emancipation of Untouchables, What Congress and Gandhi have done to the Untouchables, Pakistan Or Partition Of India, State and Minorities, Maharashtra as a Linguistic Province, The Untouchable, Buddha Or Karl Marx, Riddles in Hinduism, Manu and the Shudras अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत तसेच Janta व Mook Nayak या मासिकांमध्येही लिखाण केलाय. ज्यातून आपल्याला बाबासाहेबांचे विचार त्यांचे लेखन वाचता येऊ शकते. तसेच Speeches and Letters या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखांच्या आणि भाषणांच्या संग्रहातून सुद्धा भरपूर माहिती मिळते.
या सगळ्या पुस्तकांच्या वाचनामधून आपण बाबासाहेबांबद्दल जाणून घेऊ शकतो. तर तुम्ही यातील किती पुस्तके वाचली आहेत? हि माहिती तुम्हाला कशी वाटली? ते कंमेंट….