Akola शहरातील गुडही भागात एका माथेफिरूने क्रूरतेचा कळस गाठला आहे. कुत्रे सातत्याने भुंकतात, या कारणामुळे एका व्यक्तीने २५ पेक्षा जास्त Dogs विषारी औषध दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली असून, प्राणीप्रेमी समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कुत्र्यांना विषारी औषध देण्यामुळे २४ तासांच्या आत या २५ हून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला. मृत श्वानांमध्ये मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचा समावेश आहे. काही कुत्र्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
प्राणीप्रेमी संदीप गावंडे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, मारेकऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अकोला शहरात या घटनेने एकच खळबळ उडवली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून, नागरिकांमध्ये या घटनेबद्दल रोष आहे.
