Spread the loveआजवर अनेकांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले, पण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम उलगडून एक धक्कादायक कहाणी सांगितली. सुरुवातीला सुरेश धस यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे यांच्या इन्व्हॉल्व्हमेंटबद्दल चर्चा केली. “यांचा मुख्य आका कोण?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले की आम्हीही याचा शोध घेत आहोत. धस यांनी सुदर्शन घुलेवर आरोप करत त्याच्या आर्थिक स्त्रोतांबद्दल शंका उपस्थित केली. त्यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपींनी एका मोठ्या कटाची योजना आखली होती. सरपंचांच्या हत्येमागची मन हेलावून टाकणारी कहाणी सरपंचांच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की पिस्तूल असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून ती काढून घेण्यात यावी. सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे आणि सुरेश धस यांचे भावनिक भाषण ऐकल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Spread the loveJaykumar Gore प्रकरणात आजवर अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीचं चालतं होत्या. पण आज स्वतः मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर भाष्य करत, या प्रकरणाशी संबंध असल्याचं म्हणत Supriya Sule and Rohit Pawar यांचा या सगळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तर याप्रकरणी पुढील चौकशी होणार असल्याचं देखील स्पष्ट केलय. म्हणूनच देवेंद्र फडणवीस विधानभवनात काय म्हणाले? त्यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर कोणते गंभीर आरोप केले आहेत? काही दिवसांपूर्वी अचानक २०१६ सालाच जयकुमार गोरे यांचं प्रकरण समोर आलं होत. त्यानंतर हळू हळू या प्रकरणाने जोर पकडला आणि रोज नवनवीन माहिती आणि खुलासे या प्रकरणात होत होते. ज्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती. याकाळात अनेक आरोप करण्यात आले, अश्यातच जयकुमार गोरे यांना धमकी देणाऱ्या महिलेला खंडणी घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे या प्रकरणाला एक नवीनच वळण लागले. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार? याकडे अनेकांचं लक्ष्य लागले होते. अश्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर सभागृहात भाष्य करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली घटना दुदैवी आहे. कोणाला जीवनातून उठवण्याच्या उद्देशाने राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांच्यासंदर्भातील केस 2016 मध्ये घडली, 2019 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता देखील झाली होती. ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. त्यानंतर अचानक हे प्रकरण उकरून काढले गेले. अशा प्रकरणांमध्ये कुटुंबात, समाजात अपमान होईल या भीतीपोटी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मी जयकुमार गोरे यांच्या हिमतीची दाद देतो. त्यांना ज्यावेळी लाजेची मागणी झाली त्यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार केली. तेव्हा ट्रॅप लावण्यात आला. सगळी मागणी, संवाद टेप झाला. पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर सापळा रचून कॅश देताना आरोपीला पकडण्यात आले. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता.” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यांनी विधानभवनात केलं. या वेळी सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात काय समोर आलं आहे, याबद्दल देखील माहिती दिली आहे. ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला, युट्युबर व पत्रकार तुषार खरात आणि अनिल सुभेदारसह काही लोकांचा हा नेक्सस असल्याचं आढळलं आहे. हे सर्व एकमेकांशी संबंधित आहेत. या लोकांनी जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत, ते सगळे सापडले आहेत. दुदैवाची गोष्ट म्हणजे या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेट संपर्कात दिसत आहेत. प्रभाकरराव देशमुख यांच्याशी आरोपी बोलत होते. त्याहीपेक्षा वाईट वाटतं की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातसोबत झाले आहेत. तसेच आरोपींनी तयार केलेले व्हिडीओ देखील त्यांना पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असून, आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे, हे देखील त्यांनी स्प्ष्ट केलं आहे. तर “शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीवर काय परिणाम होत असेल? याचा विचार आपण करायला हवा. आपण राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत, अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे कान देखील टोचले आहेत
Spread the loveHeavy Rainfall in Next 3 Days देशावर दुहेरी संकट (Dual Crisis in India): हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानुसार, देशात दुहेरी संकट पाहायला मिळत आहे. एकीकडे ओडिशा, झारखंड, आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेचा कडाका आहे, तर दुसरीकडे उत्तर भारतात जोरदार पावसाचा अंदाज आहे. या दोन्ही परिस्थितींमुळे पुढील तीन दिवस धोक्याचे आहेत. उष्णतेचा कडाका (Heatwave Alert): जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rainfall Alert): दिल्लीतील पाऊस (Rainfall in Delhi): नागरिकांसाठी सूचना (Advisory for Citizens): निष्कर्ष (Conclusion): हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशात दुहेरी संकट आहे. उष्णतेचा कडाका आणि जोरदार पाऊस या दोन्ही परिस्थितींमुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.