इंदूरमधील Raja Raghuvanshi याच्या क्रूर हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. लग्न होऊन अवघा एक महिना झाला असताना, पतीच्या एका शौकाचा गैरफायदा घेत पत्नी सोनम रघुवंशीने त्याची हत्या घडवून आणली. मेघालयमध्ये ट्रेकिंगदरम्यान घडलेल्या या घटनेने अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.राजा रघुवंशीचा एक खास शौक सोनमला समजला आणि त्याचाच फायदा घेत तीने मेघालयमध्ये हनिमून दरम्यान पतीची क्रूर हत्या केली.

शौकाचा बनवला फास
Raja Raghuvanshi ला ट्रेकिंगची विशेष आवड होती. ही माहिती सोनमला त्यांच्या एकत्र वेळेत समजली होती. त्याचाच वापर करत सोनमने मेघालयसारख्या दूरच्या ठिकाणी राजाला ट्रेकिंगच्या निमित्ताने घेऊन जाण्याचा प्लान केला. तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि इतर तिघांच्या मदतीने तिने ही हत्या अंजाम दिली.
भाऊ विपिनचा खुलासा
Raja Raghuvanshi च्या भावाने सांगितलं की, सोनमने राजाच्या ट्रेकिंगच्या आवडीचा उपयोग केला. लग्नाआधीपासूनच सोनम आणि राज कुशवाह एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यात झालेल्या चॅटिंगमधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
चॅटिंगमध्ये स्पष्ट हत्या योजना
13 मे रोजी रात्री 3 वाजता झालेल्या चॅटिंगमध्ये सोनमने राज कुशवाहला लिहिलं होतं, “टॉर्चरमुळे मी थकली आहे. मी मरते किंवा तू त्याला मार.” यावर राजने उत्तर दिलं, “हो करतो.” यावरून स्पष्ट होतं की ही हत्या पूर्वनियोजित होती.
हनिमूनचं निमित्त, खूनाचा कट
लग्नानंतर काही दिवसांतच सोनमने जबरदस्तीने Raja Raghuvanshi ला हनिमूनसाठी मेघालयमधील शिलॉन्गला नेलं. तिथे तिने सुपारी किलर्सच्या मदतीने त्याची हत्या करून मृतदेह दरीत फेकला. हत्या घडल्यानंतर सोनम आणि इतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
मंदिरात एकही फोटो नाही
राजाच्या भावाने आणखी एक बाब अधोरेखित केली की, कामाख्या देवीच्या मंदिरात गेल्यानंतरही सोनमने एकही फोटो काढला नाही. हे देखील तिच्या हेतूबाबत संशय निर्माण करत.
भावनिक अभिनय, दिशाभूल
शिलॉन्गचे डीआयजी डीएनआर मारक यांच्या माहितीनुसार, सोनम सतत चौकशीत चुकीची माहिती देत आहे. अनेक वेळा ती इमोशनल होण्याचा अभिनय करते आणि सर्व आरोप राज कुशवाहवर टाकते. तर राज कुशवाह सोनमलाच मास्टरमाइंड ठरवत आहे. त्यामुळे सत्य कोण आणि खरा गुन्हेगार कोण हे स्पष्ट होण्यासाठी SIT ने दोघांना समोरासमोर बसवून 25 प्रश्नांची यादी तयार केली आहे.
गुन्हा कबूल, परंतु कोण मास्टरमाइंड?
दोघांनीही गुन्हा कबूल केला आहे. मात्र कोण मास्टरमाइंड झालेलं नाही. सोनमने गुन्हा कबूल करतानाही अनेक बाबी गोंधळात टाकणाऱ्या सांगितल्या आहेत. त्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
समाजमन हादरवणारा प्रकार
Raja Raghuvanshi आणि सोनम रघुवंशी यांचे लग्न प्रेमविवाह होता, मात्र इतक्या कमी काळात अशा क्रौर्याने हत्या होणे हे अत्यंत धक्कादायक आहे. प्रेम, फसवणूक, सूड, गुन्हा आणि भावनांचा खेळ यामध्ये एका निष्पाप तरुणाचा बळी गेला आहे.
Meghalaya Murder Case: सोनमने उघड केला रक्तरंजित कट