Akshaya Tritiya Gold Purchase
enjoying Entertainment fun games Green India lifestyle melody आजच्या बातम्या

Is Akshaya Tritiya Gold Purchase a Good Investment? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

Spread the love

Akshaya Tritiya Gold Purchase करणे ही आता शहाणपणाची गुंतवणूक झाली आहे. 2019 मध्ये 31,729 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने खरेदी केलेल्या सोन्याने आतापर्यंत 200 टक्के नफा दिला आहे. सोन्याची किंमत 1.10 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

कल्पना करा की, तुम्ही 2019 च्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केले असते, जेव्हा किंमत 31,729 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, तेव्हा तुम्ही आज जवळजवळ 200 टक्के नफा कमावला असता. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 च्या अक्षय तृतीयेशी तुलना केली तर सोन्याचा भाव 73,240 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आतापर्यंत 30 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. सोन्याच्या परताव्याचे हे आकडे Ventura Securities नुसार आहेत.

10 वर्षांत सोन्याच्या दरात 68,500 रुपयांची वाढ

HDFC Securities च्या अहवालानुसार 2015 ते 2025 दरम्यान म्हणजेच 10 वर्षांत सोन्याच्या किंमतीत 68,500 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. म्हणजेच अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ तर आहेच, शिवाय दीर्घकाळात आपल्या गुंतवणुकीला ही दमदार परतावा दिला आहे.

हलके दागिने आणि नाणी खरेदी

सोन्याचा भाव 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहोचला आहे, परंतु अक्षय तृतीया 2025 साठी ग्राहकांचा उत्साह अजूनही जोरदार आहे. Riddhi Siddhi Bullion Limited चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी म्हणतात की, सोन्याच्या चढ्या किमतीमुळे ग्राहकांचे वर्तन बदलले आहे. आता लोक जड सोन्याच्या दागिन्यांऐवजी हलके दागिने आणि नाणी खरेदी करत आहेत.

कोठारी म्हणाले की, दक्षिण भारतातील लोकांसाठी हा सण खूप खास आहे. त्यामुळे आजकाल खरेदीसाठी दुकानांमध्ये जास्त लोक पोहोचत आहेत. पण सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे लोक आता जड आणि महागड्या दागिन्यांऐवजी हलके दागिने किंवा लहान सोन्याची नाणी घेण्यास प्राधान्य देत आहेत.

सराफा व्यावसायिकांची ती ट्रीक

Akshaya Tritiya Gold Purchase

सोन्याच्या वाढत्या किमतीला सामोरे जाण्यासाठी ज्वेलर्सही नवनवीन युक्त्या अवलंबत आहेत. दागिन्यांचे नवे डिझाईन आणत आहेत, मेकिंग चार्जेसवर सूट देत आहेत आणि ग्राहकांना जुने दागिने बदलून नवीन दागिने देण्याचा पर्यायही देत आहेत. विकल्या जाणाऱ्या सोन्याचे प्रमाण थोडे कमी असले तरी त्याचे भाव जास्त असल्याने एकंदर विक्री मूल्य कमी होत नसून वाढू शकते. सोने खरेदीसाठी लोक अजूनही उत्सुक असल्याचे स्पष्ट झाले असून ज्वेलर्सही ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आपल्या ऑफरमध्ये बदल करत आहेत.

सोन्याचा भाव 1.10 लाखांच्या घरात

Axis Securities च्या कमॉडिटी रिसर्चचे वरिष्ठ विश्लेषक देवया गगलानी सांगतात की, सणासुदीच्या दिवशी सोनं खरेदी करायचं असेल तर एकाच वेळी जास्त खरेदी करू नका. त्याऐवजी थोडी थोडी खरेदी करणे चांगले ठरेल.


  • Babasaheb Reservation फक्त 10 वर्षासाठी दिलं होतं?

    Babasaheb  Reservation फक्त 10 वर्षासाठी दिलं होतं?

    Spread the loveबाबासाहेबांनी Reservation फक्त १० वर्षांसाठी दिलं होतं का? गरजवंत मराठ्यांचा लढा घेऊन जरांगे पाटील मुंबईत पोहोचले आणि पुन्हा एकदा मेन स्ट्रिम मिडीयापासून ते सोशल मिडीयापर्यंत सगळीकडे Babasaheb Reservation सुरु झाली. सोशल मिडियावरील चर्चेत काही ठिकाणी Dr. Babasaheb Ambedkar यांनी संविधानात Reservation फक्त दहा वर्षासाठी दिलं होतं. अशा प्रतिक्रीया येऊ लागल्या. आरक्षण म्हणजे काय…


  • Gold Rate: दिवाळीला सोनं खरेदी करावं का? की धोका?

    Gold Rate: दिवाळीला सोनं खरेदी करावं का? की धोका?

    Spread the loveया दिवाळीत Gold खरेदी करणं योग्य का धोकादायक? Gold Prices : सोन्याचे दिवस आले का हे माहीत नाही. पण सोन्याला दिवस आले हे नक्की. सोन्याने ऐन सनासुदिला घेतलेली भरारी. त्यामुळे आता ते प्रतितोळा ३ लाखापर्यंतही जाऊ शकतं किंवा पुन्हा घसरुन ८० हजारावरही येऊ शकतं. असे दोन्ही अंदाज वर्तेवले जात आहेत. सोनं प्रतितोळा ₹3…


  • Amit Thackeray Pune: ABVP कार्यालयाला टाळं, मनसेला नवसंजीवनी!

    Amit Thackeray Pune: ABVP कार्यालयाला टाळं, मनसेला नवसंजीवनी!

    Spread the loveAmit Thackeray Pune : पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी ABVP च्या कार्यालयाला टाळं ठोकलं मनसेचे नेते Raj Thackeray यांचे सुपुत्र Amit Thackeray यांनी आज पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्हा संदर्भात त्यांनी ही भेट घेतली आहे. कोणत्या प्रकरणात ही भेट झाली. त्यानंतर मिडीयाशी बोलताना Amit Thackeray…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *