Shweta Tiwari
Bollywood सिनेमा

Shweta Tiwari Life Story: दोन लग्न, एकटी आई आणि 93 लाखांची पोटगी – जाणून घ्या तिची धक्कादायक कहाणी

Spread the love

Shweta Tiwari– एक अशी अभिनेत्री जिने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली, पण तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र खूप खडतर गेलं आहे. टीव्हीवर ‘प्रेरणा’ म्हणून प्रसिद्ध झालेली श्वेता आपल्या बोल्ड, क्लासी आणि आत्मविश्वासाने ओळखली जाते. पण तिच्या लग्न आणि घटस्फोटाच्या कहाण्या अनेकांना धक्का देतील अशा आहेत.

पहिलं लग्न आणि घरगुती हिंसाचार

1998 मध्ये श्वेतानं अभिनेता राजा चौधरीशी लग्न केलं. हे एक इंटरकास्ट लग्न होतं. काही काळ सगळं ठीक चाललं, पण नंतर घरगुती हिंसाचारामुळे तिच्या आयुष्यात अंधार पसरला. Shweta Tiwari नं हिम्मत दाखवून राजा चौधरीविरुद्ध केस केली आणि 2012 मध्ये त्यांचं घटस्फोटानं संपलं.

या घटस्फोटामध्ये विशेष बाब म्हणजे, Shweta Tiwari नं नवऱ्याकडून पोटगी घेतली नाही, उलट तिनंच 93 लाखांचा फ्लॅट राजा चौधरीच्या नावावर केला. फक्त घटस्फोटासाठी! ती म्हणाली, “मुलगी नको, पण घर हवं” – या वाक्यानं तिला आतून हादरवलं.

दुसरं लग्न आणि पुन्हा दु:ख

पहिल्या नात्यातून बाहेर पडल्यानंतर Shweta Tiwari पुन्हा प्रेमात पडली. यावेळी तिचा जोडीदार होता अभिनेता अभिनव कोहली. 2013 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगाही झाला. पण काही काळातच त्यांच्या नात्यात फूट पडली आणि 2019 मध्ये ते वेगळे झाले.

सिंगल मदरचा प्रवास

आज श्वेता तिवारी ही दोन मुलांची आई आहे आणि ती त्यांचा एकटीने सांभाळ करते. तिची मुलगी पलक तिवारी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. श्वेता स्वतःही अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसते आणि आजही तिचं सौंदर्य आणि आत्मविश्वास प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो.

श्वेताची ही कहाणी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरते – जेव्हा आयुष्य संकटात येतं, तेव्हा ताकदीनं उभं राहता आलं पाहिजे, हे ती आपल्या अनुभवातून सांगते.


पुढे वाचा:

  • टीव्ही अभिनेत्रींचं पर्सनल आयुष्य: कोणते घटस्फोट झाले चर्चेत?
  • पलक तिवारीचं बॉलिवूड डेब्यू – आईच्या पावलावर पाऊल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *