अलीकडे Ghibli Art ॲनिमेशनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लोक AI प्लॅटफॉर्म्स वापरून आपल्या फोटोंना घिबली स्टाईलमध्ये रूपांतरित करत आहेत. पण काहींना फोटो तयार करताना अडचणी येत आहेत. काळजी करू नका! या टिप्स तुमच्या मदतीस येतील.
Ghibli फोटो तयार करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स:
- नैसर्गिक पार्श्वभूमी निवडा: झाडे, फुले, नदी, नाले, डोंगर अशा नैसर्गिक घटकांसह असलेले फोटो सर्वोत्तम ठरतात.
- सौम्य प्रकाशाचा वापर: Ghibli स्टाईलमध्ये प्रकाश मऊ आणि स्वप्नवत असतो. त्यामुळे भडक प्रकाश किंवा उन्हात घेतलेले फोटो टाळा.
- सौम्य रंगसंगती: हिरवळ, आकाश, सूर्यास्त यासारखे घटक घिबलीच्या भावनांना आणखी उठाव देतात.
- अत्यंत फिल्टर टाळा: जास्त फिल्टर असलेले किंवा डिजिटल संपादित फोटो टाळा, कारण घिबली स्टाईल नैसर्गिक सौंदर्यावर आधारित असते.

