Pune Hinjwadi Bus Fire: पुण्यातील हिंजवडी येथील व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला 20 मार्च 2025 रोजी भीषण आग लागली. या आगीत कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, या घटनांचा तपास सुरू केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीत, चालक जनार्दन हबर्डीकरने कबूल केले की, त्यानेच आग लावली होती आणि सुरुवातीला बेशुद्ध असल्याचे नाटक केल्याचे सांगितले.
चालक जनार्दन हबर्डीकर याच्यावर आग लावण्याचा आरोप असून त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला कंपनीकडून पगार मिळालेला नव्हता आणि त्याला चांगली वागणूक दिली जात नव्हती. त्याच्या तक्रारीनुसार, त्याच्या दिवाळी बोनसमध्ये कपात केली गेली होती आणि त्याला जेवणाचा डबा खाण्याचा वेळ देखील दिला गेला नव्हता. त्याच्या या मानसिक दबावामुळे त्याने गाडीला आग लावली.
घटना घडल्यानंतर, जनार्दन हबर्डीकरला बेशुद्ध असल्याचं भासवण्यात आले. परंतु पोलिसांच्या चौकशीत त्याने आपलं कृत्य कबूल केलं आणि म्हटलं की, त्याला अशी मोठी घटना होईल याची कल्पनाही नव्हती. त्याच्या क्रोधामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि त्याला याचं खूप दु:ख होत आहे.
पोलिसांनी त्याची तपासणी केल्यानंतर, चालकाने बेंजामिन केमिकल आणि कापडाच्या तुकड्यांचा वापर करून आग लावली होती आणि खुद्द त्यानेच बसच्या बाहेर उडी मारली होती. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला आहे.
व्योमा ग्राफिक्स कंपनीचे मालक नितेन शाह यांनी सांगितले की, “आम्ही चालकाचे पगार थकवले नाही. पोलिस तपास करत आहेत आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत.” याव्यतिरिक्त, मृतक सुभाष भोसलेंच्या कुटुंबीयांनी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे एक प्रश्न उपस्थित झाला आहे – कंपनीकडून कसा घातक बेंझिन केमिकल चोरीला गेला? यामुळे कंपनीच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
