महाराष्ट्राच्या राजकाणातला अविभाज्य घटक म्हणून राज ठाकरे किंवा ठाकरे बंधुंकडे पाहिलं जात. परप्रांतियांच्या विषयात रोकठोक आणि आक्रमक भुमिका घेणाऱ्या Raj Thackeray वर आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात Prashant Kishor यांनी एक वक्तव्य केलं आहे. देशातील सर्वात मोठे राजकीय रणणीतीकार म्हणून ज्या प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिलं जातं. Raj Thackeray यांच्यावर दोन आरोप सतत होतात. पहिला म्हणजे त्यांना स्वतःचे दोन आमदारही निवडून आणता येत नाहीत. दुसरा म्हणजे ते सतत आपली भुमिका बदलत असतात. यातल्या पहिल्या आरोपावर येऊयात. जरी हे खरं असलं की २०१९ मध्ये मनसेचा १ आमदार आणि २०२४ मध्ये शुन्य आमदार निवडून आले. तरिही राज ठाकरेंची महाराष्ट्राच्या आणि विशेषकरुन शहरी भागाच्या राजकारणावर पकड असल्याचं आणि त्यांच्यामुळे राजकीय गणितं बदलतात हे राजकिय जाणकारांना चांगल माहीत आहे. Raj Thackeray फक्त मिडियासाठीचा मुद्धा नसुन महाराष्ट्रातल्या एका मोठ्या लोकसंख्येचा आवाज आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. दुसरा विषय येतो की ते नेहमी भुमिका बदलतात. राज ठाकरेंच याच्यावर अनेकवेळा स्पष्टिकरण आलेलं असलं किंवा त्यांच त्याच्यावर काहीही म्हणणं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात असा कोणताच पक्ष शिल्लक राहिलेला नाही ज्याने आपल्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षासोबत युत्या आघाड्या केल्या नाहीत. भाजप अजित दादांसोबत जाऊ शकतं, कॉंग्रेस Raj Thackeray सोबत जाऊ शकतं. तरिही त्यांना मतात काही फरक पडत नसेल तर महाराष्ट्र हितासाठी म्हणून राज ठाकरे भाजपसोबत गेले काय किंवा राष्ट्रवादी सोबत गेले काय. याचा परिणाम त्यांच्या एकूण राजकारणावर पडता कामा नये. पण हा विषय आपण आत्ता का बोलत आहोत तर बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन एका हिंदी वाहिणीनीला मुलाखत देताना प्रशांत किशोर यांनी राज ठाकरेंचं नाव घेत त्यांना लंपन इलेमेंट असल्याचं म्हटलं आहे. या वक्तव्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. लंपन इलेमेंट म्हणजेच जास्त महत्वाचा नसलेला घटक. प्रशांत किशोर राजकीय रणणीनीतीकार ज्यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींचं पॉलीटीकल कॅंम्पेन केलं. पंजाब मध्ये कॉंग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचं काम केलं. ममता बॅनर्जीचं कॅंम्पेन पश्चिम बंगाल मध्ये केला. एका निवडणूकीत उद्धव ठाकरेंसोबतही काम केलं. तमिळनाडूच्या स्टलीनसाठी सुद्धा पॉलीटीकल कॅम्पेनींग सांभाळलं. भारताच्या राजकारणाला आपल्या पॉलीटीकल मार्केटिंग किंवा ज्याला कॅंम्पेन म्हणतात त्याच्या जोरावर दिशा देण्याचं काम केलं. त्यांना राज ठाकरेंचा एवढा राग कशामुळे? तर सध्या ते स्वतःच निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. आणि एक पार्टी काढून बिहारच्या राजकारणात स्वतःचं नशिब आजमावत आहेत. याच जनस्वराजचा प्रचार करण्यासाठी किंवा त्याच्याविषयी बोलण्यासाठी त्यांनी एका हिंदी चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये महिला पत्रकाराने त्यांना बिहारी लोकांवर महाराष्ट्रात अन्याय होतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे याच्यावर बोलतात. असं सांगत त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल हा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी म्हटलं. “राज ठाकरे हे लंपन इलेमेंट आहे. तिथे महानगरपालिकेची निडणूक आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी काम केलेलं आहे. त्यावेळी बिहारी लोकांवर हल्ले करु नका हिच माझी फी असेल असं त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे Raj Thackeray च्या शिवसेनेने २०१९ नंतर बिहारी लोकांवर एकही हल्ला केल्याचं उदाहरण दाखवा” असं त्यांनी ठाम पणाने सांगितलं. मुळात काय तर आपलं राजकारण चमकवण्यासाठी बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन प्रशांत किशोर हे महाराष्ट्रातील नेत्यांवर बोलत आहेत. किंवा मी उद्धव ठाकरेंना सांगून कसं उत्तरेतल्या लोकांवर होणारे हल्ले थांबवले हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःचं राजकारण चमकवताना ज्यांनी अजुन स्वतःचा एकही आमदार निवडून आणलेला नाही. त्या प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रातल्या एका अशा नेत्याला नावं ठेवणं म्हणजे स्वतःची उंची वाढवण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्यासारखं काम आहे. त्यांनी अनेकांना राजकीय यश मिळवून देण्यासाठी कॅंम्पेनींगच काम केलेलं असलं तरीही स्वतः लोकात जाऊन निवडणूका लढणं वेगळी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना राजकीय यश मिळालेलं नसलं तरीही हा चळवळींचा महाराष्ट्र आहे. इथे प्रत्येकजण आपला विचार घेऊन पुढे येत असतो. आणि त्याचा धोरणांवर परिणाम झालेला आहे. राज ठाकरेंच्या माध्यमातून मराठीच्या हितासाठी लढण्याची चळवळ ही सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांना त्याची जाणीवही आहे. हेच त्यांनी समजून घ्यायला हवं. Farmers Income Tax : महाराष्ट्रातला शेतकरी किती टॅक्स भरतो? बघा पूर्णच गणित…
Tag: Uddhav Thackeray
Ambadas Danve यांची महाजन भेट: शिवसेना-मनसे समीकरण?
११ जून २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी राजकीय हालचाल झाली. शिवसेना (ठाकरे गट) चे विरोधी नेते Ambadas Danve यांनी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांची थेट राहत्या घरी भेट घेतली. विशेष म्हणजे ही भेट भाजप नेते नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यातील तणावपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलीच उधाण आली आहे. राणे-विरोधातून युतीकडे वाटचाल? नितेश राणे यांनी केलेल्या बोलून प्रकाश महाजन यांनी टीका केली होती. नंतर त्याविषयीची संतप्त प्रतिक्रिया देता नारायण राणेंनी महाजनांना थेट धमकी दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर Ambadas Danve यांनी महाजनांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. ती भेट सहवेदना व्यक्त करण्यापुरती मर्यादित नव्हती, अशे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. दानवे म्हणाले. “प्रकाश काका आमचे जुने सहकारी आहेत. मी त्यांना भेटायला आलो, जरी ते समर्थ असले तरी अशा प्रसंगी एकत्र असणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जर एकत्र यायचं ठरवलं, तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू.” Ambadas Danve यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांना आणखी गती मिळाली आहे. महाजनांचं मिश्कील उत्तर महाजन ने स्पष्ट केलं की, “मी आणि अंबादास आधी एका पक्षात होतो. ते मला भेटायला आले कारण मी एका मोठ्या पैलवानाला (राणेना) पाडलं. आकाशात ग्रह तारे एकत्र येत आहेत, काय घडेल सांगता येत नाही.” त्यांच्या या विधानामागे युतीचा संकेत असावा का, हा सवाल राजकीय सर उपस्थित झाला आहे. राणे पिता-पुत्रांचा वाद नितेश राणेंनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर टिप्पणी केली – “एकाचे २० तर एकाचे ० आमदार!” महाजनांनी प्रत्युत्तर दिलं – “नितेश राणेंची उंची उभी लवंगे एवढी आणि बसल्यावर विलायची एवढी!” नारायण राणे संतापले – “लायकीत राहा, उलट्या करायला लावेन.” महाजन – “माझे बरेवाईट झालं तर जबाबदार राणे असतील. आंदोलन करीन.” राज-उद्धव युतीचा राजकीय अर्थ सध्या मुंबई, पुणे, नाशिक महापालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे. प्रभाग रचना निश्चित होत असून, दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा अधिक गती घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीनंतरच अधिकृत प्रस्तावांची देवाणघेवाण होणार आहे. मात्र Ambadas Danve आणि प्रकाश महाजन यांची भेट ही पहिली ठोस कृती मानली जात आहे. राजकीय संकेत स्पष्ट! Ambadas Danve आणि प्रकाश महाजन दोघंही आपल्या पक्षाततडफदार आणि प्रभावी नेते मानले जातात. या भेटीनंतर, दोन्ही बाजूंनी संवादाची दारं उघडी ठेवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भेट ठरवलेली नव्हती, असा दावा दोघांनी केला असला तरी यामागे मोठी रणनीती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या Gratis, सहवेदना आणि सल्लामसलत आता उघडपणे समोर येत आहे. हे नुसतेच मैत्रीपूर्ण संवाद नसून, महापालिकेच्या रणधुमाळीत शक्य तितक्या ताकदीनं उतरण्याची तयारीही असू शकते. प्रकाश महाजन आणि अंबादास दानवे यांची भेट ही या वाटचालीतील पहिली जाहीर पायरी ठरू शकते. राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही – पण या भेटीने स्पष्ट केलं आहे की, महाराष्ट्रात शिवसेना-मनसे समीकरणं नजीकच्या काळात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात करू शकतात. हॉटेल Tiranga भाग्यश्री 7777 नेमका विषय काय ? ढवारा जेवण, सोन्याची साखळी अन फॉर्च्यूनर। नुसती चर्चा
मोठी बातमी! ठाकरे बंधूंननतर आता Ajit Pawar- Sharad Pawarही एकत्र येणार?
वीन वर्तमानात: महाराष्ट्राच्या राजकारणीत पट्टयातच्या घटनाच्या घटणेची चर्चा प्रसारचित चालू आहे. थोडच युती निगाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या ने महाराष्ट्रातील राजकारण क्षेत्रीत केल्या तार केल्या चक्रा च्याच्या चर्चेची चर्चा चाचर चालू झालू आहे. राज ठाकरे ने याच्या चार्च्यात, “आमची भांडणं छोटी आहेत, पण महाराष्ट्र मोठा आहे” अशी भावना व्यक्त केली केल्या. त्याची नाओखक उद्धव ठाकरेंनी सट्रघात प्रतिक्रिया दिली. या बातमीनानंतर अता पवार घराण्यात कुन नेत्याची काथनी काळ समोर एक गड्डी नेत्याने केल्या अजितदादांना नावेन एकत्र येण्याच्याच्या अपर्यंक्षतपणे अवहान केलेलें. जेवह पट्या राजकारणाच्या घटनाच्या उत्तर-चढत घटणाच्या तीव्र पहाणारे माग एक गोढ पाहिलेल. #RajThackeray #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #MaharashtraPolitics Ajit Pawar- Sharad Pawar Update
Disha Salian Death Case: आदित्य ठाकरे प्रकरणात किती आहे सत्य? वाचा नवीन याचिकेतील गंभीर आरोप
Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनंतर तिच्या पालकांनी पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे. याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेषतः, 8 जून 2020 च्या रात्रीच्या पार्टीमध्ये आदित्य ठाकरे घटनास्थळी उपस्थित होते, असा आरोप विरोधक करत आहेत. याचिकेच्या अनुसार, दिशा सालियनच्या मृत्यूच्या रात्री तिच्या मालवणी येथील घरात एक पार्टी सुरू होती. त्यात आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोर्या यांची उपस्थिती होती, ज्यामुळे पार्टीचा माहोल बदलला आणि दिशा सालियनचे जिवंत राहणे त्रासदायक ठरले, असा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे. याचिकेत असा देखील आरोप करण्यात आला आहे की, दिशाच्या मृत्यूनंतर अनेक राजकारणी आणि पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले आणि आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्याच वेळी, आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीसोबत 44 वेळा फोनवर बोलल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुशांत सिंह राजपूत याचाही मृत्यू झाला, ज्यामुळे दोन्ही प्रकरणे एकाच कालावधीत आली. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे कुठे होते?2022 मध्ये आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या खुलाशानुसार, दिशा सालियानच्या मृत्यूनंतर ते रुग्णालयात होते आणि त्यांच्या आजोबांवर उपचार सुरू होते. आदित्य ठाकरेंनी यावरून स्पष्ट केले की, कोणत्याही आरोपांपेक्षा सत्य बाहेर येईल. दिशा सालियन प्रकरणामध्ये वाद आणि आरोपांच्या लाटांमुळे पुन्हा एकदा राजकारणात तापले आहे. पुढील तपास आणि न्यायालयाच्या निर्णयावर सर्वांचा लक्ष लागले आहे.