जगप्रसिद्ध उद्योजक Elon Musk Sold X: मस्क यांनी ‘X’ 33 अब्ज डॉलर्सला विकले, जाणून घ्या कारण! यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) 33 अब्ज डॉलर्समध्ये विकले आहे. विशेष म्हणजे, ही खरेदी मस्क यांच्या स्वतःच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI ने केली आहे. हा व्यवहार ऑल-स्टॉक ट्रान्झॅक्शन स्वरूपात करण्यात आला आहे, ज्यामध्ये संपूर्ण रक्कम स्टॉक्सच्या माध्यमातून अदा केली गेली आहे. मस्क यांनी 27 ऑक्टोबर 2022 रोजी ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केले होते. त्यानंतर, 24 जुलै 2023 रोजी त्यांनी ट्विटरचे नाव आणि लोगो बदलून X ठेवले. या विक्रीमागचं कारण काय?अंदाज आहे की मस्क यांनी आपल्या xAI कंपनीसाठी अधिक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेतला. तसेच, ही विक्री त्यांच्या डिजिटल आणि AI प्रकल्पांसाठी निधी संकलनाचं एक मोठं पाऊल ठरू शकते.