Amit Thackeray Pune : पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी ABVP च्या कार्यालयाला टाळं ठोकलं मनसेचे नेते Raj Thackeray यांचे सुपुत्र Amit Thackeray यांनी आज पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्हा संदर्भात त्यांनी ही भेट घेतली आहे. कोणत्या प्रकरणात ही भेट झाली. त्यानंतर मिडीयाशी बोलताना Amit Thackeray काय म्हणाले. आणि या एका प्रकरणामुळे पुण्यात मनसेचा पुनरुज्जीवन करण्याचा कसा प्रयत्न सुरु आहे. काल पुण्याच्या वाडीया कॉलेचमध्ये महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं. त्यावेळी काहीजणांनी बायकॉट मनविसे जॉईन ABVP असे पोस्टर लावण्यात आले. यामुले आक्रमक झालेल्या मनविसेच्या कार्यकर्त्यांनी थेट एबीव्हिपीचे सदाशिव पेठेतील कार्यालय गाठलं आणी त्याला टाळं ठोकलं. जोरदार घोषणाबाजीनंतर पोलीसांनी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर ABVP ने म्हणजचे अखील भारतीय विद्यार्थी परिषदेने जी भाजपची स्टुडंट विंग आहे त्यांनी सदाशिव पेठेतील त्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. काल दिवसभर हा सगळा राडा सुरु होता. आज मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे सुपुत्र Amit Thackeray यांनी यासंदर्भात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यानंतर मिडियाशी बोलताना त्यांनी त्यांची बाजू मांडली. ते म्हणाले, “आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नाही. कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. दुसऱ्यांच्या कामात येण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. काल एका कार्यालयाला टाळं ठोकलं आहे. त्यांनी लावलेल्या पोस्टरबाबत मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज आहे. यातील ती मुलं त्या संघटनेची निघाली तर त्यांची सर्व कार्यालयं बंद करावी लागतील. यापुढं जर आम्ही पोस्टर लावले आणि बॉयकॉट अभाविप लिहिलं तर चालेल का? तसंच या पुढं आमची अशीच ॲक्शनला रिएक्शन मिळणार.” एका पत्रकाराने विचारलं की एबीव्हीपीचं म्हणणं आहे की हे पोस्टर आम्ही लावले नाहीत. त्यावर अमित ठाकरे म्हणाले उद्या तुमच्या कार्यक्रमात आम्ही असेच पोस्टर लावले तर चालतील का? मुळात त्यांचं अस्तित्वच पुण्यात राहिलेलं नाही. अशी खोड काढणं दोनदा झालं आहे. असं बोट घालायचं काम केलं तर आम्ही हात घालू. ते सत्तेत असले तरी कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी इथं आलो आहे. मी आमच्या पोरांच्या मागे उभाय कारण ते उत्तम काम करतायत. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या आंदोनलामुळे मनसेला पुण्यात नवसंजीवणी मिळण्याची आशा आहे. त्यामुळेच अमित ठाकरे स्वतः पुण्यात आले. गेल्या काही काळापासून वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर तर पुण्यात मनसेला संथपणा आला होता. आता या प्रकणामुळे ऐन महानगरपालीकेच्या तोंडावर मनसेला नव्याने जोशाने काम करायला संधि मिळाली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ही आयती संधी मनसेला दिली आहे. तसं पहायला गेलं तर मनसे हा पक्षचं अश्या आंदोलनातून उभा राहिलेला आहे. त्याचे कार्यकर्ते सुद्धा अशा आंदोलनासाठी ओळखले जातात. ते कुणालाही अंगावर घ्यायला भित नाहीत. मगं तो सत्ताधारी भाजप का असेना. मागील काळात टोलसाठी राज ठाकरेंचं झालेलं आक्रमक आंदोलन असो नाहीतर अजुन काही. त्यामुळे पुन्हा एकदा २८ नगरसेवक ज्या पुण्याने मनसेचे निवडून दिले होते तशी आशा पुन्हा एकदा असल्याने हे प्रकरण त्याच्यासाठी पुरक ठरु शकतो. वाचा अजून संबंधित बातम्या- Nilesh Ghayval Controversy : कर्जत-जामखेड मध्ये Rohit Pawar आणि Ram Shinde यांचे एकमेकांवर आरोप.
Tag: Pune politics
Samir Patil प्रकरण: धंगेकरांचा चंद्रकांत पाटीलवर नवा आरोप
समीर पाटील कोण आहेत? Sameer Patil कोण आहे याचा तपास मिडियाने केला आणि त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते कोथरुडमध्ये राहणारे आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय चालवणारे व्यक्ती असल्याचं समोर आलं. कोथरुडमध्ये ते चंद्रकांत पाटलांशी संबंधित असले तरी ते भाजपचे सदस्य देखील नाहीत. शिवाय मी असं काही करत असल्यास त्याचे पुरावे धंगेकरांनी द्यावेत असं त्यांनी न्युज मिडियाशी बोलताना सांगितलं. माझ्यावर साधी एसी सुद्धा मागच्या २५ वर्षात दाखल नाही असं ते यावेळी म्हणाले. शिवाय यासंबंधी अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धंगेकर विरुद्ध भाजप नेते या सगळ्यात विशेष बाब म्हणजे धंगेकर आता महायुतीत आहेत. मात्र तरिही त्यांनी भाजपनेत्यांना टार्गेट करायचं सोडलेलं नाही. who is धंगेकर? या चंद्रकांत दादांच्या वाक्याने त्यांना चांगलाच फायदा झाला होता. महायुतीत येऊनही धंगेकर काय Chandrakant Patil चा पिच्छा सोडत नाही असं दिसतय. असं असलं तरिही शिंदेंच्या शिवसेनेत राहून जे धंगेकर निलेश घायवळ सोबतच्या संबंधांवरुन दुसऱ्या पक्षातील नेत्यांना धारेवर धरत असताना तिकडे रोहीत पवारांनी मात्र शिंदें गटाच्या दोन आमदारांचाही निलेश घायवळला पळवून लावण्यात हात असल्याचं म्हटलं आहे. विरोधकांचा आरोप आणि सत्ताधाऱ्यांची अडचण त्यामध्ये कळमुनरीचे आमदार संतोष बांगर आणि भूम-परांड्याचे आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांचा सहभाग असल्याचं रोहीत पवार म्हणाले. आणि याच्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे खुद्द राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनीच निलेश घायवळच्या भावाला रिवॉल्वर ठेवण्याचा परवाना दिला आहे याच्यावरुनही शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. दरम्यान Sameer Patil यांच्या अब्रुनुकसानीचा दावा करण्याच्या वक्तव्याला उत्तर देताना धंगेकर म्हणाले की “माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असं समीर पाटील म्हणाले, ते १०० कोटींचा मालक आहे असा दावा करतात. त्यानंतर समीर पाटील कोण हे तपासल्यावर चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला असणारे त्यांचे फोटो दिसले. १०० कोटींचा मालक असेल आणि राजकारणाचा काही संबंध नसेल तर हा तिथे काय करतो? मी समीर पाटीलचे फोटो ट्विट केलेत. नव्या समीकरणांची चाहूल समीर पाटीलला पहिला मोक्का लागला होता. २० वर्षापूर्वी पुण्यात आलेला समीर पाटील १०० कोटींचा मालक कसा झाला? चंद्रकांत पाटील कदाचित आत्मचिंतन करत असतील त्यामुळे या प्रकरणावर बोलत नसतील. संशयाची सुई त्यांच्यावर आहे त्यांनी बोललं पाहिजे अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. चंद्रकांत पाटील यांच्याकडे बेरोजगार युवकांना पाठवले पाहिजे. १०० कोटी कसे कमवायचे हे कळेल. चंद्रकांत पाटलांचा मानस पुत्र असल्यासारखे फोटो समीर पाटील लावतो. समीर पाटलांनी माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे म्हणजे मला अजून माहिती मिळेल. घायवाळ टोळी संपवली पाहिजे. पोलिसांनी फडकं टाकून गोळ्या पुसल्या पाहिजेत. समीर पाटील आणि निलेश घायवाळचे अनेक फोटो आहे. लोकशाहीत तुम्ही केलेले पाप कधीतरी उघड होते. जे राजकारण सुरू आहे ते थांबवले पाहिजे. समीर पाटील यांच्या व्यवहाराची चौकशी केली सर्व धागेदोरे उघड होतील असं धंगेकर यांनी म्हटलं आहे. Sangram Jagtap Statment : हिंदुत्ववादी बनलेले संग्राम जगताप Ajit Pawar यांच्या नोटीसीला जुमानतील का?