June Weekly Horoscope: महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होत आहे आणि बरेच लोक नव्या आठवड्याकडे आशेने पाहत आहेत. तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल? कोणते निर्णय योग्य ठरतील? कोणत्या दिवशी कामं यशस्वी होतील? हे सर्व टॅरो कार्ड व वैदिक राशीविश्लेषणाच्या आधारे जाणून घेऊया. ♈ मेष (Aries)लकी रंग: पांढरा लकी नंबर: 2 लकी डे: बुधवार टीप: या आठवड्यात तुमच्या मनात अनेक विचार येतील. पण अतिविचार टाळा. सकस आहार व नियमित व्यायाम तुमचं मन स्थिर करेल. नवीन निर्णय घेताना संयम ठेवा। ♉ वृषभ (Taurus)लकी रंग: गुलाबी लकी नंबर: 8 लकी डे: बुधवार टीप: एखाद्या खास गोष्टीची योजना करत असाल, तर ती इतरांशी शेअर करू नका. गुप्तता पाळल्यास यश नक्की मिळेल. आर्थिक बाबतीत सतर्क राह/. ♊ मिथुन (Gemini)लकी रंग: जांभळा लकी नंबर: 1 लकी डे: बुधवार टीप: कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्पात तुमचं नाव होऊ शकतं. संवादात स्पष्टता ठेवा. ♋ कर्क (Cancer)लकी रंग: पिवळा लकी नंबर: 1 लकी डे: मंगळवार टीप: इतरांवर सहज विश्वास ठेवणं टाळा. तुमचे निर्णय स्वतःच घ्या. घरगुती वातावरणात तणाव जाणवू शकतो, पण संयमाने परिस्थिती हाताळा. ♌ सिंह (Leo)लकी रंग: हिरवा लकी नंबर: 5 लकी डे: सोमवार टीप: घरात पाहुण्यांचे आगमन संभवते. यामुळे घरातील वातावरण उत्साही राहील. कुटुंबासोबत वेळ घालवा, तोच तुमचं मानसिक बळ ठरेल. ♍ कन्या (Virgo)लकी रंग: हिरवा लकी नंबर: 9 लकी डे: शुक्रवार टीप: या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल संभवतात. नवीन ऑफर्स किंवा प्रमोशनची शक्यता आहे. आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. ♎ तूळ (Libra)लकी रंग: निळा लकी नंबर: 5 लकी डे: गुरुवार टीप: नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. सोशल नेटवर्किंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. ♏ वृश्चिक (Scorpio)लकी रंग: सिल्व्हर लकी नंबर: 6 लकी डे: बुधवार टीप: जुन्या मित्रांपासून सावध राहा. शक्यतो नवे मित्र निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या गोष्टी शेअर करताना सावधगिरी बाळगा. ♐ धनु (Sagittarius)लकी रंग: भगवा लकी नंबर: 8 लकी डे: बुधवार टीप: मनाचा गोंधळ दूर करण्यासाठी योग व ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. शारीरिक हालचाल वाढवा. तुम्हाला ऊर्जा मिळेल व मानसिक शांतता लाभेल. ♑ मकर (Capricorn)लकी रंग: निळा लकी नंबर: 9 लकी डे: गुरुवार टीप: शनिवारी केलेलं दान तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल. गुरुवारी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ काळ आहे. ♒ कुंभ (Aquarius)लकी रंग: पांढरा लकी नंबर: 2 लकी डे: सोमवार टीप: शिक्षक, गुरु, सल्लागार यांच्या मार्गदर्शनाने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल येतील. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. ♓ मीन (Pisces)लकी रंग: जांभळा लकी नंबर: 8 लकी डे: बुधवार टीप: घरात एखादी शुभ बातमी येण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांच्या आनंदात तुमचं मन रमेल. तुमचं योगदान कौतुकास्पद ठरेल. (टीप : वरील राशीभविष्य ABP माझाच्या टॅरो वाचकांच्या मार्गदर्शनावर आधारित असून, याला अंधश्रद्धा समजून निर्णय घेऊ नयेत. याचा हेतू वाचकांसाठी मार्गदर्शनात्मक आहे.) Surya Rashi परिवर्तन 2025 : कोणत्या Rashi चं नशीब फळणार? – Donald Trump -Elon Musk वादात नवा ट्विस्ट, Musk यांनी अचानक पलटी का मारली? #donaldtrump #elonmusk