Sudhir Mungantiwar political news
political news political news आजच्या बातम्या

Sudhir Mungantiwar News : Devendra Fadnavis साठी कुणाकुणाचा राजकीय बळी?

Devendra Fadnavis शी वाकडं म्हणजे मसनात लाकडं. एकदम परफेक्ट मॅच होत नाही म्हणा. पण भाजप म्हणजे सबकुछ Devendra Fadnavis. हे तर सगळ्यांना माहीतचं आहे. सध्या भाजपमधला एक नावं असंच अज्ञातवासात टाकलं जाातयं. त्याचं नाव आहे Sudhir Mungantiwar. काही महिन्यांपुर्वी भाजपाचा एक आमदार कार्यक्रम आयोजित करतो, या कार्यक्रमात काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रम अध्यक्षांचा सन्मान दिला जातो. तर भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असणाऱ्या Sudhir Mungantiwar यांचं निमंत्रण पत्रिकेत सगळ्यात शेवटी नाव असतं. आणि मंग सुरू होतं ते कार्यक्रमाच राजकारण. तर हे राजकारण अखेर येऊन ठेपतं ते सुधीर मुनगंटीवार यांच्या भोवती. चंद्रपूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्या दरम्यानची ही घटना. पण प्रश्न फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये तर मागील अनेक वेळा मुनगंटीवारांना डावललं गेल्याचं पहायला मिळालंय म्हणूनच खरंच सुधीर मुनगंटीवार यांना डावललं का ? डावललं तर कोणी डावललं. जोरगेवारांनी कि भाजपने की फडणवीसांनी. पण प्रश्न हा फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये, लोकसभेवेळी Sudhir Mungantiwar नी त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तरी सुद्धा पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिलं, त्यावेळी Sudhir Mungantiwar राज्यात कोणाला नकोसे झाले आहेत? अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. तर त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील मुनगंटीवार यांना भाजपाकडून तिकीट मिळेल का नाही यावर साशंकता व्यक्त केली जात होती. अश्यातच मुंडेंना तिकीट मिळालं ते विजयी देखील झाले मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते असून देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. आणि आता हा कार्यक्रम. त्यामुळे भाजपा कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांना संपवू पाहतेय अशा चर्चा देखील जोर धरत आहेत मात्र याचं काय कारण असू शकत ते पाहूया. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचाच भाग असून देखील अनेकदा त्यांनी कोणत्याही घटनेवर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे तर त्यांच्या या भूमिकांमुळे भाजपा पक्षाला किंवा भाजपच्या नेतृत्वावर त्याचा विपरीत परिणाम हॊईल का नाही याचा देखील विचार करत नव्हते. खास करून 2019 मध्ये भाजपा-सेना युती तुटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे या बाबत नाराजी व्यक्त केली होती. आणि सुधीर मुनगंटीवार यांचा हाच स्पष्ट वक्तेपणा भाजपला अडचणीत आणू शकतो म्हणून पक्षाकडून येथूनच त्यांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात झाली असं बोललं जात. दरम्यानच्या काही काळात Sudhir Mungantiwar हे सक्रिय राजकारणातून बाहेर असल्याच पाहायला मिळालं. तर मागील महायुती सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रिमंडळात कोणतेही महत्त्वाचं मंत्रिपद देण्यात आल नव्हत. आणि लोकसभेला झालेल्या पराभवानंतर Sudhir Mungantiwar हे अजूनच राज्याच्या राजकारणातून बाहेर पडत गेले आणि हे सगळं भाजपाकडून जाणीवपूर्वक केलं गेलं, ज्या मागे हेतू एकच होता तो म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा राजकारणातील हस्तक्षेप कमी करणे. एकंदरीत काय तर महाराष्ट्रात Devendra Fadnavis ना कुणीही पर्याय झालेला खुद्द त्यांना किंवा कदाचीत दिल्लीतल्या भाजप नेत्यांनाही चालत नाहीये. यासाठी विनोद तावडेंना केंद्रात पाठवण्यात आलं. या विधानसभेच्या आदल्या दिवशी त्यांना पैशासहित पकडल्याच्या बातम्यांनी त्यांची महाराष्ट्रातली घरवापसीही कायमची रद्द झाली. पंकजा मुंडे इतक्या दिवस शांत बसुन कमबॅक करण्याची वाट पाहत होत्या. त्यात विधानसभेतील पराभव, लोकसभेतील पराभव तरीही मंत्रीमंडळातील संधी यामुळे बॅकफुटवर गेलेल्या मंत्रीमंडळातील संधीमुळे थोड्या स्थिरस्थावर झाल्या. मात्र फडणवीसांना शह देतील अशी परिस्थिती त्यांची सध्यातरी नाहीये. यानंतर येतं सर्वांना माहीत असलेलं एकनाथ खडसेंच नाव. भावी मुख्यमंत्री म्हणून बघीतलं गेलेल्या या नेत्याचा अक्षरशः बाजार उठवला गेला. जेवढी हेळसांड विरोधी पक्षात असताना झाली नव्हती तेवढी भाजप सत्तेत आल्यापासून झाली. कारण एकचं देवेंद्र फडणवीस. वाचा अजून संबंधित बातम्या-Narendra Modi यांच्या हातून सत्ता जाण्याचे संकेत : Chandrababu Naydu यांच्या नावाची चर्चा

Gopichand Padalkar
आजच्या बातम्या ताज्या बातम्या महाराष्ट्र

Padalkar Statement : सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया

भाजप आमदार Gopichand Padalkar यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पडळकरांनी राजारामबापू पाटील यांच्या औलाद असल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. यावर त्यांच्या जिवलग मित्र आमदार Sadabhau Khot यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपली लढाई राजारामबापूंच्या वारसांशी आहे, व्यक्तीशी नाही. त्यांनी पडळकरांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे मान्य करतानाच, त्यांना भविष्यात जपून बोलण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वक्तव्याची निंदा केली असून, पडळकरांना समज दिल्याचे सांगितले. मात्र, या संपूर्ण घडामोडीतून सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. BJP आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून, जाती-पातीचा राजकारणात मुद्दा पुढे सरकवला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आह Gopichand Padalkar वादग्रस्त वक्तव्य आणि राजकीय वाद महाराष्ट्रातील राजकारणात वारंवार वादग्रस्त वक्तव्ये आणि त्यातून निर्माण होणारे वाद ही नवी बाब नाही. मात्र, अलीकडेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्व असलेले आणि अनुभवी नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटील यांच्यावर पडळकरांनी व्यक्तिगत आणि पातळी सोडून टीका केली. Gopichand Padalkar यांनी जयंत पाटील यांना ‘बिनडोक माणूस’ असे संबोधत त्यांच्याकडे अक्कल नाही असे कठोर शब्द वापरले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद असल्यासारखे वाटत नाही, असे अपमानास्पद वक्तव्य केले. या विधानामुळे राजकारणात मोठी चर्चा सुरु झाली असून, पडळकरांवर टीकेची झोड उठली आहे. Maharashtra Debt Crisis : लाडकी बहिण योजना राज्याच्या आंगलट आलीय का? संपुर्ण आकडेवारी. सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया पडळकरांचे जिवलग मित्र आणि शेतकरी संघटनेतून आलेले आमदार सदाभाऊ खोत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट सांगितले की, आपली लढाई राजारामबापू पाटील यांच्याबरोबर नसून त्यांच्या वारसांशी आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये करणं अयोग्य आहे. त्यांनी मित्र म्हणून पडळकरांना जपून बोलण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी जाती-पातीचे बी शोधण्याचे काम शरद पवार यांनीच केल्याचे सांगितले. जातीनिहाय दरी निर्माण करण्याचे पेटंट त्यांच्याकडेच आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. भाजपमधील पडळकरांची प्रतिमा Gopichand Padalkar हे प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा स्पष्टवक्तेपणा दाखवला आहे. मात्र, त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा वारंवार वादग्रस्त ठरतो. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही त्यांच्यावर वेळोवेळी नाराजी व्यक्त करावी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, पडळकरांचे वक्तव्य चुकीचे आहे आणि त्यांना समज दिली आहे. फडणवीस म्हणाले की, पडळकर हे तरुण नेते आहेत, भविष्यात त्यांना चांगली संधी मिळू शकते. त्यामुळे त्यांनी जपून बोलले पाहिजे. जयंत पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी Jayant Patil हे राज्यात अनुभवी आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले आहे. सांगली जिल्ह्यातील त्यांचे वर्चस्व एकेकाळी निर्विवाद होते. मात्र, अलीकडच्या काळात त्यांना राजकीय आव्हानांचा सामना करावा लागला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर हे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी ठरले आहेत. राजकारणातील पातळीवरचा प्रश्न पडळकरांचे वक्तव्य हे केवळ वैयक्तिक पातळीवर न थांबता राजारामबापूंसारख्या थोर नेत्यांचा उल्लेख करून केल्याने त्यावर अधिकच संताप व्यक्त केला जात आहे. राजकारणात मतभेद असणे साहजिक असले तरी पातळी सोडून केलेली वक्तव्ये केवळ व्यक्तीच नव्हे तर समाजातील मोठ्या गटाचा अपमान करतात. Sharad Pawar आणि Devendra Fadnavis हे दोन नेते एकत्र येण्याच्या चर्चा कशामुळे?

Ashadhi Wari -Pandharpur
आजच्या बातम्या धार्मिक महाराष्ट्र

Ashadhi Wari साठी 1109 दिंड्यांना 20,000₹ अनुदान मंजूर

महाराष्ट्रातील लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. Ashadhi Wari 2025 साठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान जाहीर केलं आहे. या निर्णयाला प्रशासनाची मंजुरी मिळाली असून, शासन निर्णयही (GR) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे. पंढरपूर Ashadhi Wari ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक यात्रांपैकी एक मानली जाते. त्यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात आणि विविध जिल्ह्यातून निघणाऱ्या पालख्यांसोबत दिंड्याही सामील होतात. या दिंड्यांच्या व्यवस्थेसाठी दरवर्षी राज्य सरकार विशेष अनुदान जाहीर करत असते. 2024 मधील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 1109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. 2025 मध्यीदेखील मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या या दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये म्हणजेच एकूण 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपयांचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे. वितेंद्रौ वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ या उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातून निघणाऱ्या पालख्यांसाठी 5,000 पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये डॉक्टर्स, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल स्टाफ, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य सेवा मुक्कामांच्या मुक्कामी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक मुक्कामी वैद्यकीय तपासणी केंद्र उभारण्यात येणार असून, या ठिकाणी उपचार, तपासणी आणि ‘चरणसेवा’ दिली जाणार आहे. यामध्ये स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचा समन्वय असणार आहे. Security-ज्याच्या डोळ्यांनेही राज्य पोलीस यंत्रणा तयार होण्यात आली आहे. Ashadhi Wari च्या मुख्य सोहळ्यासाठी (6 जुलै 2025) 6,000 पोलीस अधिकारी, 3,200 होमगार्ड व राज्य राखीव पोलीस दलाच्या 6 तुकडे तैनात करण्यात येणार आहेत. संपूर्ण पालखी मार्गावर ड्रॉनच्या सहाय्याने नजर ठेवली जाऊ शकत आहे. संपूर्ण Ashadhi Wari दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. यामुळे वारकऱ्यांना अधिक सुरक्षित, आरोग्यदायी व सुलभ वातावरण मिळणार आहे. हा निर्णय केवळ धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनातून नव्हे, तर वारकऱ्यांच्या सेवेसाठी सरकारकडून उचललेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. हनुमानाचा तिरस्कार, राक्षसाची पूजा Daityanandur गावाच्या परंपरेचा खतरनाक इतिहास | Marathi Mystery

Bacchu Kadu
आजच्या बातम्या

Bacchu Kadu यांची प्रकृती चिंताजनक; आंदोलनाचा 5 दिवस

राजकारणात कोणत्या एका नेत्याने अन्नत्याग आंदोलन करत शेतकऱ्यांची मागणी सरकारपुढे ठामपणे मांडली, तिकडे त्याला जनतेचा पाठिंबा मिळतो. सध्या सुद्धा अशीच एक गंभीर स्थिती माजी मंत्री Bacchu Kadu यांच्याभोवती निर्माण झाली आहे. त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे व त्यांची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक बनत आहे. सकाळी प्रकृती खालावलीआज सकाळी Bacchu Kadu यांना उलट्या झाल्या असून त्यांना उठून बसण्यासाठीही त्रास होत आहे. गेल्या पाच दिवसांत त्यांनी अन्नाचा एकही कण घेतलेला नाही. यामुळे त्यांचे वजन चार किलोने घटले आहे. ही बाब अत्यंत गंभीर बनली असून राज्यभरातून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चिंता आहे. आंदोलनाची पार्श्वभूमीBacchu Kadu या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते असून, नेहमीच ग्रामीण जनतेच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे आवाज उठवत असतात. मागील काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी आत्महत्या, शेतमालाला दर नसणे, घरकुल योजनांतील तफावत आणि दिव्यांगांना न मिळणारे मानधन हे प्रश्न समोर आले होते. या साऱ्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी 5 जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आंदोलनातील मागण्याBacchu Kadu यांनी सरकारकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत: शेतमालाला कमीतकमी आधारभूत किंमतीवर (MSP) 20% अनुदान द्यावे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना स्वतंत्र मंडळ स्थापून 10 लाख रुपयांची मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी. दिव्यांग आणि विधवा महिलांना दरमहा 6000 रुपये मानधन द्यावे. ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी शहरासारखे निकलावून कमीतकमी 5 लाखांचे अनुदान द्यावे. धनगर समाजासाठी आरक्षण तात्काळ लागू करावे आणि बेरोजगार तरुणांना नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण द्यावे. राज्यभरातून पाठिंबाBacchu Kadu या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत आहे. अनेक कार्यकर्ते उपोषणस्थळी पोहोचत आहेत. त्यांच्याशी एकजूट दाखवण्यासाठी माजी मंत्री महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. सरकारची प्रतिक्रिया आणि बैठकराज्य सरकारकडून अद्याप यावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, बच्चू कडू यांच्या आंदोलनाची गंभीरता लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत आज दुपारी ऑनलाईन बैठक होणार आहे. यामध्ये बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख जाहीर करेल, तेव्हाच आंदोलन मागे घेतले जाईल. वैद्यकीय पथकांची तपासणीBacchu Kadu यांची प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे उपोषणस्थळी वैद्यकीय पथक दाखल झाले असून त्यांची तपासणी सुरू आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती आणि औषधोपचार घेण्याचा सल्ला दिला आहे, मात्र Bacchu Kadu यांनी स्पष्ट केले आहे की मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. लोकशाहीतील ताकदलोकशाहीत आंदोलन हा लोकशक्तीचा प्रमुख मार्ग आहे. बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन केवळ त्यांच्या मतदारसंघापुरता मर्यादित नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो. त्यांच्या मागण्या केवळ व्यक्तिगतरित्या नाहीत, तर संपूर्ण शेतकरी, दिव्यांग आणि ग्रामीण जनतेसाठी आहेत.

Fadnavis-Raj Thackeray
आजच्या बातम्या

Fadnavis-राज ठाकरे तासभराची बैठक; मोठी राजकीय हालचाल

गुरुवारी सकाळी वांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक जबरदस्त घडामोड घडली. राज्यांचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल तासभर बैठक झाली. ही बैठक जरी गुप्त ठेवण्यात आली असली तरी, तिच्या बातम्या बाहेर येताच राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. राजकीय घडामोडींचा नवीन अध्याय?राज ठाकरे आणि ठाकरे गटाची युती होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. परंतु या बैठकीने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी थेट देवेंद्र Fadnavis यांची भेट घेणे ही खूपच महत्त्वाची राजकीय खूण मानली जात आहे. बैठकीचा वेळ, ठिकाण आणि एकांतराज ठाकरे सकाळी ताज हॉटेलला पोहोचला. त्याचवेळी मुख्यमंत्री Fadnavis यांचा ताफा देखील तेथे दाखल झाला. काही वेळात दोघेही एका खास खाजगी बैठकीसाठी रूममध्ये गेले. जवळपास तासभर ही बैठक सुरू होती. विशेष म्हणजे या बैठकीस भाजप किंवा मनसेतील कोणताही इतर नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे ही बैठक फक्त दोन नेत्यांमध्येच मर्यादित राहिले. चर्चेचा विषय काय?सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. विशेषतः आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत राजकीय युतीची शक्यता तपासण्यात आली. भाजप आणि मनसे या दोन पक्षांमध्ये संभाव्य युती, जागा वाटप, प्रचाराचे नियोजन, आणि एकत्र काम करण्याबाबतचा आराखडा तयार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटावर दबाव?ही बैठक ठाकरे गटासाठी एक प्रकारचा दबाव असू शकतो. शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस-राष्ट्रवादी युती अजून ठोस स्वरूपात दिसून आलेली नाही. अशातच जर भाजप आणि मनसे एकत्र आले, तर ठाकरे गटासाठी ही नवी अडचण ठरू शकते. विशेषतः मुंबईसारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेच्या मराठी मतांवर भाजपची पकड वाढवण्याची रणनीती असू शकते. युती होणार का?राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत सौम्य भूमिका घेतली होती. तसेच मनसेने अयोध्या दौरा, हिंदुत्ववादी अजेंडा आणि भोंगेविरोधातील आंदोलनाद्वारे भाजपशी वैचारिक जवळीक निर्माण केली होती. त्यामुळे या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. फडणवीसांची रणनीती स्पष्टमुख्यमंत्री देवेंद्र Fadnavis यांनी मराठी मतदारांपैकी पकड मिळवण्यासाठी मनसेसोबत युतीचा विचार करत असल्याचे जाणवते. भाजप अलर्ट असताना सध्या शिवसेनेतून विभाजित झालेल्या शिंदे गटासोबत सत्तेत आहे. पण मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत असल्याने, भाजपला मराठी मतांमध्ये अधिक आधार मिळवण्यासाठी राज ठाकरे यांची गरज भासू शकते. राज ठाकरे काय निर्णय घेतील?राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट नाही. लेकिन भाजपबरोबर असणारा अर्थ प्रशासनिक, वित्ते आणि प्रचारात मोठा समर्थन मिळू शकतो. लेकिन त्याचवेळी मनसेची स्वतःची ओळख राखणं कायम आहे का, याची निर्णय घेतलं जाईल.”. Political Twist: फडणवीसांची हिंट पण अजित पवार – सुप्रिया सुळे एकत्र? NCP Pawar vs Pawar Over?

The final phase of Samruddhi Mahamarg
आजच्या बातम्या

Samruddhi Mahamarg चा अंतिम टप्पा पूर्ण, 61 हजार कोटींचा प्रकल्प

महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे Samruddhi Mahamarg. देशातील सर्वात लांब आणि अत्याधुनिक महामार्गांपैकी एक असलेल्या या प्रकल्पाचा अखेरचा म्हणजेच चौथा टप्पा इगतपुरी ते आमणे या दरम्यानचा रस्ता पूर्ण झाला आहे. यामुळे आता एकूण 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. या महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यातील अह्वानपाटी वरून Ajit Pawar यांनी माहिती दिली की, हा प्रकल्प साकारण्यासाठी तब्बल 12 कोटी cement bags व 7 लाख metric ton steel चा वापर करण्यात आला आहे. सुरुवातीला अपेक्षित खर्च 55,500 कोटी होता, मात्र प्रत्यक्षात हा खर्च 61,000 crore रुपयांवर गेला आहे. विकासाचा राजमार्गसमृद्धी महामार्गाला Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg नौक देण्यात आलं आहे. याचा मुख्य उद्देश नागपूर ते मुंबई प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी करणे, औद्योगिक विकासाला चालना देणे आणि पर्यावरणपूरक उपायांनी राज्याला नवा चेहरा देणे हा होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींचा सहभागया महामार्गाच्या कल्पना तत्काळ मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी दिला. आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री असतांना याच प्रोजेक्टचा अखेरचा टप्पा पूर्ण होतांना पाहणे, हे एक अनोखं संयोग असल्याचं Ajit Pawar यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या योगदानाबद्दलही त्यांनी विशेष उल्लेख केला. “आमच्या Audi गाडीचे सारथ्य एकनाथ शिंदे यांनी केलं. मी फक्त बघत होतो की सगळं व्यवस्थित आहे की नाही,” असं मिश्कीलपणे Ajit Pawar म्हणाले. इंधन बचत आणि वेळेची बचतप्रवाशांना या महामार्गामुळे केवळ वेळेचीच एकपेक्षा protester मिरãच बहुतवजा आनी बचत सुद्धा होणार आहे. Nashik ते Mumbai या अंतराने आता केवळ काही तासांत पार करता येईल. महामार्गाच्या गती मर्यादा 120 किमी/तास असतानाही बोगद्यात ती गती 100 किमी/तास याबद्दल अजितदादांनी एक गमतीशील किस्सा सांगितला. फडणवीसांनी कार चालवीत असतांना 120 किमी/तास वेग जोडला आणि नियमांचं पालन केल्याचंही त्यांनी सांगितलं. रोजगार आणि औद्योगिकीकरणSamruddhi Mahamarg हा प्रकल्प केवळ रस्ते विकासापुरता मर्यादित नाही. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना औद्योगिक झोन, लॉजिस्टिक पार्क्स, शहरविकास होण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. विरोध आणि भूसंपादनAjit Pawar यांनी सांगितलं की, या प्रकल्पाला सुरुवातीला अनेकांनी विरोध केला. पण जेव्हा भूसंपादनासाठी भरघोस दर जाहीर करण्यात आले, तेव्हा विरोध करणाऱ्यांनीही ती जमीन विकली. हा विरोध आणि त्यामागचा राजकीय खेळही त्यांनी स्पष्ट केला. पर्यावरणपूरक प्रकल्पपर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर हे लोकार्पण होणं हे एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे. महामार्ग बांधताना पर्यावरण पूरक उपाय, वृक्षारोपण, जलसंधारण प्रकल्प यांचा समावेश करण्यात आला आहे. Samruddhi Mahamarg हा केवळ एक महामार्ग नाही तर तो एक विकासाचा राजमार्ग आहे. 61 हजार कोटींचा खर्च, भव्य संरचना, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उभारलेला हा महामार्ग महाराष्ट्राला एक नवी दिशा देईल, हे नक्की. Ajit Pawar यांच्या मिश्कील भाषणात seriousness आणि commitment दोन्ही असतात. मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि Eknath Shinde यांच्या सहकार्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाला यशस्वीपणे पूर्ण केले. Political Twist: फडणवीसांची हिंट पण अजित पवार – सुप्रिया सुळे एकत्र? NCP Pawar vs Pawar Over?

Fadnavis serious allegations:
आजच्या बातम्या महाराष्ट्र

Fadnavis गंभीर आरोप: Jaykumar Gore प्रकरण, सुप्रिया-रोहित पवार

Jaykumar Gore प्रकरणात आजवर अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीचं चालतं होत्या. पण आज स्वतः मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर भाष्य करत, या प्रकरणाशी संबंध असल्याचं म्हणत Supriya Sule and Rohit Pawar यांचा या सगळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तर याप्रकरणी पुढील चौकशी होणार असल्याचं देखील स्पष्ट केलय. म्हणूनच देवेंद्र फडणवीस विधानभवनात काय म्हणाले? त्यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर कोणते गंभीर आरोप केले आहेत? काही दिवसांपूर्वी अचानक २०१६ सालाच जयकुमार गोरे यांचं प्रकरण समोर आलं होत. त्यानंतर हळू हळू या प्रकरणाने जोर पकडला आणि रोज नवनवीन माहिती आणि खुलासे या प्रकरणात होत होते. ज्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती. याकाळात अनेक आरोप करण्यात आले, अश्यातच जयकुमार गोरे यांना धमकी देणाऱ्या महिलेला खंडणी घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे या प्रकरणाला एक नवीनच वळण लागले. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार? याकडे अनेकांचं लक्ष्य लागले होते. अश्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर सभागृहात भाष्य करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली घटना दुदैवी आहे. कोणाला जीवनातून उठवण्याच्या उद्देशाने राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांच्यासंदर्भातील केस 2016 मध्ये घडली, 2019 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता देखील झाली होती. ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. त्यानंतर अचानक हे प्रकरण उकरून काढले गेले. अशा प्रकरणांमध्ये कुटुंबात, समाजात अपमान होईल या भीतीपोटी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मी जयकुमार गोरे यांच्या हिमतीची दाद देतो. त्यांना ज्यावेळी लाजेची मागणी झाली त्यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार केली. तेव्हा ट्रॅप लावण्यात आला. सगळी मागणी, संवाद टेप झाला. पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर सापळा रचून कॅश देताना आरोपीला पकडण्यात आले. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता.” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यांनी विधानभवनात केलं. या वेळी सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात काय समोर आलं आहे, याबद्दल देखील माहिती दिली आहे. ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला, युट्युबर व पत्रकार तुषार खरात आणि अनिल सुभेदारसह काही लोकांचा हा नेक्सस असल्याचं आढळलं आहे. हे सर्व एकमेकांशी संबंधित आहेत. या लोकांनी जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत, ते सगळे सापडले आहेत. दुदैवाची गोष्ट म्हणजे या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेट संपर्कात दिसत आहेत. प्रभाकरराव देशमुख यांच्याशी आरोपी बोलत होते. त्याहीपेक्षा वाईट वाटतं की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातसोबत झाले आहेत. तसेच आरोपींनी तयार केलेले व्हिडीओ देखील त्यांना पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असून, आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे, हे देखील त्यांनी स्प्ष्ट केलं आहे. तर “शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीवर काय परिणाम होत असेल? याचा विचार आपण करायला हवा. आपण राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत, अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे कान देखील टोचले आहेत

Sanjay Raut's attack on BJP
आजच्या बातम्या

पत्र काय पाठवताय, थेट कुदळ फावडे घ्या! – Sanjay Raut चा भाजपावर हल्लाबोल

शिवसेना (ठाकरे गट) खासदार Sanjay Raut यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शेखावत यांना औरंगजेबाच्या कबरीबाबत पत्र लिहिल्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी भाजपाला डिवचलं आहे. राऊत म्हणाले, “पत्रबाजी थांबवा आणि थेट कुदळ-फावडं घ्या!” त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्य आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना केवळ पत्रव्यवहार करण्याची गरज काय? बाबरी मशीद पाडताना परवानगी घेतली नव्हती, मग आता कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्य मुद्दे:

Eknath shinde live
आजच्या बातम्या महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर थेट निशाणा – “जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा!”

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “औरंगजेब जितका क्रूर होता, तितकेच फडणवीसही क्रूर आहेत” असे विधान केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या विधानावर टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदेंचा सपकाळ यांना प्रत्युत्तर: “ज्या औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याची तुलना तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करता? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून काम करतो. आम्ही राज्यासाठी लोकाभिमुख योजना आणल्या, विकासाची गती वाढवली. आमच्या कार्याची पोचपावती म्हणून जनतेने आम्हाला लँडस्लाईड मँडेट दिले. मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस आणि आम्ही टीम म्हणून काम करत आहोत.“ “कुठे औरंगजेब आणि कुठे देवेंद्र फडणवीस? अशी तुलना करण्यापूर्वी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी होती,” असे शिंदे म्हणाले. औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर संताप: “औरंगजेबाने महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तो देशद्रोही होता. त्याचं समर्थन करणारा कोणताही भारतीय देशभक्त असू शकत नाही. मग काँग्रेस नेते हे समर्थन का करत आहेत? यांचा औरंगजेब कोण लागतो? नातेवाईक आहे का? सगासोयरा आहे का?” असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला. औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला: औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग माजले असून “ही कबर उखडून काढा” अशी मागणी सत्ताधारी गटातून होत आहे. नागपुरात या मुद्यावरून हिंसाचार, दगडफेक आणि पोलिसांवर हल्ला झाला आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. 📌 महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापलेले असून, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Shetkari Andolan Ravikant tupkar
Agricalture Buldhana आजच्या बातम्या महाराष्ट्र

शेतकरी नेते Ravikant Tupkar भूमिगत; आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न फसणार?

मुंबईत शेतकरी आंदोलन पुकारले जाण्यापूर्वीच राज्य सरकारने पोलिसांच्या माध्यमातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना रात्रीतून अटक करून आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर भूमिगत झाले असले तरी आंदोलन होणारच, असे त्यांनी ठणकावले आहे. राजकीय दबावाखाली पोलिसांची कारवाई? बुलढाणा पोलिसांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, डॉ. ज्ञानेश्वर टाले, सहदेव लाड यांना मध्यरात्री झोपेतून उठवून अटक केली. रविकांत तुपकर यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला असून, त्यांची गाडी व चालकदेखील पोलिस ताब्यात घेतल्याचे समजते. “शेतकरी आंदोलन रोखण्यासाठी सरकार पोलीस यंत्रणेचा वापर करत आहे. पोलिस कुणाच्या इशाऱ्यावर हे सगळं करत आहेत?” असा संतप्त सवाल शेतकरी संघटनांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या या मागण्यांसाठी १९ मार्च रोजी मुंबईत मोठे आंदोलन होणार होते. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकारकडून पोलिसांना पुढे करून दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. रात्रीभर शेतकरी नेत्यांची धरपकड राज्यात विविध भागांमध्ये शेतकरी नेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरू आहे. बिबी, मोताळा, देऊळगाव राजा, मेहकर, जळगाव जामोदसह अनेक भागांत पोलिसांनी अटकसत्र राबवले आहे. रात्री १२.३० वाजता: अक्षय पाटील, वैभव जाणे, अजय गिरी (जळगाव जामोद)रात्री २.०० वाजता: उमेशसिंह रजपूत, प्रदीप शेळके, बंडूभाऊ देशमुख (मोताळा)रात्री ४.३० वाजता: गणेश गारोळे, हरी आसबे, आत्माराम बंगाळे, समाधान गाडे (मेहकर)सकाळी ५.०० वाजता: विनायक सरनाईक, भगवानराव मोरे, भारत वाघमारे (चिखली) अनेक शेतकरी नेत्यांच्या गाड्या जप्त करून त्यांना मुंबईकडे जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “फडणवीस सरकारला आंदोलनाची भीती!” राज्य सरकारवर टीका करत शर्वरीताई तुपकर यांनी आंदोलन चिरडण्याच्या प्रयत्नांचा निषेध व्यक्त केला. “सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे तिजोरीत पैसा नाही. कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार अडचणीत येईल म्हणून आंदोलन रोखले जात आहे. पण शेतकरी झुकणार नाहीत!” असे त्यांनी ठणकावले. आता पुढे काय? शेतकरी संघटनांनी राज्यभर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, पोलिसी कारवाईला विरोध केला जात आहे. रविकांत तुपकर भूमिगत असले तरी मुंबईतील आंदोलन होणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राजकीय वातावरण तापले असून सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे. पुढील काही तासांत शेतकऱ्यांच्या प्रतिकाराचे नवे स्वरूप दिसण्याची शक्यता आहे.