Mumbai हादरली! धावत्या लोकलमधून १२ प्रवासी रुळावर पडले; ६ जणांचा मृत्यू Mumbai – देशाची आर्थिक राजधानी असलेली आणि ‘लोकल’चा प्राणवायू म्हणून ओळखली जाणारी मुंबई आज पुन्हा एकदा एका भीषण अपघातामुळे हादरली. सकाळी गर्दीच्या वेळी Mumbai Local Accident मध्ये १२ प्रवासी धावत्या ट्रेनमधून रुळावर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, यातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. नेमकी घटना काय घडलै? घटना आज morning ie savwva nink ते saade ninking दरम्यान घडली. पुष्पक एक्स्प्रेस ही सीएसएमटीहून (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) morning ie ८ वाजून २५ मिनिटांनी निघाली होती. आणि मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान या ट्रेनमध्ये अतिरेकित गर्दी होती. त्यामुळे काही प्रवासी दरवाज्याला लटकून प्रवास करत होते. याच वेळी अचानक काही प्रवासी तोल जाऊन खाली रुळावर पडले. प्रत्यक्षदर्शींचं काय म्हणणं?घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीतकमी १० ते १२ प्रवासी ट्रेनमधून पडल्याचं त्यांनी पाहिलं. अपघात घडल्यानंतर काही जखमींना तातडीने जवळच्या प्लॅटफॉर्मवर आणून वैद्यकीय मदत मिळवून देण्यात आली. मात्र, ६ जणांचा मृत्यू झाल्याचं दुःखद वास्तव समोर आलं आहे. गर्दीचा गंभीर परिणामदरवषी शाळा, कॉलेज, नोकरीच्या वेळेस लोकल ट्रेनमध्ये होणारी गर्दी जीवघेणी ठरते. आजच्या घडामोडीतसुद्धा तेच पहायला मिळालं. सकाळच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये दरवाज्याशी लटकून प्रवास करणं सामान्य झालं आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे गंभीरतेने पाहिलं नाही, तर असे अपघात वारंवार घडत राहतील. रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रियामध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलं की, “मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान पाच प्रवासी ट्रेनमधून पडले, एवढीच माहिती सधYा आपल्याला मिळाली,” अधिकृत तपशील अजूनहरेल्वेकडे स्पष्ट नाही. रुग्णवाहिका तातडीने पाठवण्यात आल्या असून जखमींवर उपचार सुरू आहेत. सरकार आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष?मुंबईसारख्या शहरात प्रतिदिन लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेकडून फार काही ठोस उपायोजन करण्यात आलेल्या नाहीत. आजच्या Mumbai Local Accident मध्ये घडलेली घटना ही प्रशासनाच्या अपयशाचे मोठे उदाहरण आहे. पुष्पक एक्स्प्रेसची माहितीपुष्पक एक्स्प्रेस ही मुंबई ते लखनऊदरम्यान धावणारी ट्रेन असून, या ट्रेनमध्ये आज प्रवाशांनी अनधिकृतरित्या लटकून प्रवास केल्याची माहिती आहे. सध्या ही ट्रेन एक्सप्रेस असूनदेखील, लोकलसारखीच प्रवासी वाहतूक करत आहे. त्यामुळे सुरक्षा नियमांचा भंग मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे. उपाय काय असू शकतात?दरवाजे आपोआप लॉक होण्याची यंत्रणा लागू करणे. प्रवासी क्षमतेनुसार तिकीट विक्री मर्यादित करणे. गर्दीच्या वेळेस अतिरिक्त लोकल सेवा सुरु करणे. प्रवाशांना जागरूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवणे. सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक आणि तत्काळ मदत सेवा उपलब्ध करून देणे. सामाजिक माध्यमांवर संतापघटनेनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी रेल्वे प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत #MumbaiLocalAccident हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. सरकारकडून आणि रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत जाहीर झालेली नाही. Mumbai Local Accident ही घटना एक इशारा आहे. मुंबईकरांचे जीवन म्हणजे लोकल ट्रेन. जर या जीवनवाहिनीमध्येच सुरक्षितता नसेल, तर हे सरकार आणि प्रशासनासाठी गंभीर विचार करण्यासारखे आहे. आज घडलेला हा दुर्दैवी अपघात कधीही टाळता आला असता, जर योग्य नियोजन, सुविधा आणि प्रवाशांप्रती संवेदनशीलता असती. Santosh Deshmukh Case: Valmik Karad ची संपत्ती जप्त होणार? जन्मठेप होऊ शकते पण कायदा काय सांगतो ?