Olive Oil: beneficial for hair
Health Tips And Tricks

Olive Oil : केसांसाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या!

आजकाल केस गळणे, कोंडा होणे, केसांची वाढ थांबणे, केस निस्तेज होणे या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामागे मुख्यत्वे अनियमित जीवनशैली, अपुरी झोप, असंतुलित आहार, मानसिक तणाव आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा अति वापर कारणीभूत ठरतो. अशा वेळी नैसर्गिक उपाय वापरणे सर्वात चांगले आणि सुरक्षित मानले जाते. यामध्ये एक प्रभावी आणि पारंपरिक उपाय म्हणजे Olive Oil. Olive Oil हा स्वयंपाकापुरतेच मर्यादित नाही, तर त्याचा वापर आरोग्य, त्वचा आणि केसांसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेषतः केसांसाठी ऑलिव्ह ऑईल हे एक नैसर्गिक टॉनिकसारखे काम करते. चला तर मग जाणून घेऊया ऑलिव्ह ऑईल चा केसांवरील उपयोग आणि त्याचे फायदे. १. केस गळतीवर उपाय केस गळण्याच्या प्रमुख कारणे म्हणजे प्रदूषण, हार्मोनल असंतुलन, पोषणतत्त्वांची कमतरता आणि चुकीच्या उत्पादनांचा वापर. ऑलिव्ह ऑईल मध्ये प्रचंड प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन E समाविष्ट असतात. हे केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना बळकट करतं आणि गळती थांबवते. ऑलिव्ह ऑईल मालीश नियमित करताना केस गळणे कमी होते. २. डोक्यातील कोरडेपणा व खाज कमी करतो olive oil चा मॉइश्चरायझिंग गुणधर्म खूप उपयुक्त आहे. कोरडी टाळू, खाज आणि त्वचेचा त्रास कमी करण्यासाठी हे तेल प्रभावी ठरते. ऑलिव्ह ऑईल मध्ये बुरशीविरोधी गुणधर्म आहेत जे डोक्यातील कोंडा नियंत्रित करतात. ३. केसांना मऊपणा आणि चमक देतो जर तुमचे केस रुखरुखीत, विस्कटलेले आणि निस्तेज वाटत असतील तर olive oil हा एक उत्तम पर्याय आहे. हे तेल केसांना एक कोटिंग देते ज्यामुळे केस मऊ, मुलायम आणि चमकदार होतात. प्री-शॅम्पू म्हणून याचा वापर केल्यास केसांचं टेक्स्चर सुधारतं. ४. केसांच्या वाढीस चालना देतो ऑलिव्ह ऑईल मुळे टाळूतील रक्ताभिसरणात सुधार, जे केसांच्या वाढीस चालना देतं. त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषणद्रव्ये मुळे केस अधिक जलद आणि निरोगी वाढतात. नियमित वापरामुळे केसांची दाटी आणि लांबी दोन्ही वाढतात. ५. रासायनिक पदार्थांपासून संरक्षण आजकाल अनेक लोक केसावर स्ट्रेटनिंग, कलरिंग, ब्लो ड्राय इ. प्रकार करत असतात. या सर्व प्रक्रियांमुळे केसांचे नुकसान होते. ऑलिव्ह ऑईल केसावर एक सुरक्षात्मक थर निर्माण करतं, जे केसांना उष्णता आणि रसायनांपासून वाचवतं. olive oil वापरण्याचा योग्य मार्ग 2-3 चमचे ऑलिव्ह ऑईल थोडं गरम करून घ्या. टाळूपासून मुळांपर्यंत बोटांच्या टोकाने टस करा. अधिकिमान 1 तास किंवा संध्याकाळी लावून रात्रभर ठेवणे अधिक फायदेशीर. दुसऱ्या दिवशी सौम्य शॅम्पूने केस धुवावेत. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय केल्यास उत्तम परिणाम दिसतो. केस गळणे, कोंडा आणि केसांची वाढ थांबण्याच्या समस्येवर नैसर्गिक, केमिकल फ्री उपाय म्हणून olive oil हे अत्यंत प्रभावी ठरते. हे एक घरगुती उपाय असून कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय केसांचे संपूर्ण पोषण करते. आजच पासून olive oil ला आपल्या केसांच्या निगेसाठी आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट करा. लोणार सरोवर कसे तयार झाले ? संपूर्ण इतिहास | LONAR LAKE BULDHANA HISTORY