NEET UG 2025
Updates

NEET UG 2025 निकाल जाहीर, टॉपर्स यादी देखील जाहीर

NEET UG 2025: देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. National Testing Agency (NTA) ने NEET UG Result 2025 अधिकृतपणे प्रसिद्ध केला असून, या परीक्षेत बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. NEET परीक्षा ही देशभरातील MBBS, BDS, BAMS, BHMS आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळविण्याचा मुख्य मार्ग आहे. चला तर पाहूया यंदाच्या निकालात काय घडले आहे, कोण टॉपर ठरले, आणि निकाल कसा पाहायचा याबद्दल सविस्तर माहिती. निकाल कसा पाहाल? NEET UG 2025 चा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील: सर्वप्रथम https://neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.होमपेजवर “NEET UG 2025 Result” या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आपले लॉगिन क्रेडेंशियल्स – ॲडमिट कार्ड नंबर, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. सबमिट केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल. तो डाउनलोड करून प्रिंटही काढता येईल. यंदाचा टॉपर कोण? NEET UG 2025 मध्ये कित्येक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल प्रदर्शन केले आहे. यंदाच्या परीक्षेतील टॉपर्सची यादी जाहीर करण्यात आली असून, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्लीसह विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी टॉप रँक मिळवले आहेत. कित्येक विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, जे अत्यंत उल्लेखनीय आहे. मागील वर्षाचा टॉपर – रूपायन मंडल NEET UG 2024 मध्ये पश्चिम बंगालच्या जिल्ह्यातील मुर्शिदाबाद मधील रूपायन मंडल याने 720 मधील 720 गुण मिळवून देशात विजयी ठरला होता. त्याची तयारी नववीपासून झाली होती. त्याच्या वडिलांनी फिजिक्सच्या क्षेत्रात विशेष मार्गदर्शन केल्यामुळेच त्याला लाभ झाला होता. त्याने ऑनलाइन आणि ऑफलाइन कोचिंग एकत्रितपणे घेतले होते. हे यश नियोजन, सातत्य आणि अभ्यासावर आधारित होते. यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्ये यंदाच्या NEET UG परीक्षेत सहसा 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांचे स्कोअरकार्ड, कटऑफ, आणि रँक यादी वेबसाइटवर पाहता येथे आहे. NEET UG 2025 च्या उत्तरतालिका आणि अंतिम उत्तरपत्रिका आधीच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यंदाचा कटऑफ गेल्या वर्षांच्या तुलनेत किंचित वाढलेला आहे. पुढील टप्पे – काउंसिलिंग प्रक्रिया NEET UG चा निकाल लागल्यानंतर आता नंतरचा टप्पा म्हणजे काउंसिलिंग. MCC (Medical Counselling Committee) तर्फे All India Quota (AIQ) अंतर्गत होणारी काउंसिलिंग प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. राज्यस्तरीय काउंसिलिंग प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू होईल. विद्यार्थ्यांनी संबंधित अधिकृत वेबसाइटवर नियमित अपडेट तपासणे गरजेचे आहे. NEET चा अभ्यास करणाऱ्यांसाठी टिप्स: वेळेचे योग्य नियोजन करा. NTA च्या अधिकृत अभ्यासक्रमानुसार तयारी करा. मागील वर्षांचे पेपर्स आणि मॉक टेस्ट्सचा सराव करा. तणाव न घेता सातत्याने अभ्यास करत रहा. बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्सवर समसमान भर द्या. Auto Driver Story: महिन्याला 8 लाख कमावणारा मुंबईचा Viral रिक्षावाला | कसे मिळतात पैसे? सत्य काय?