Manoj Jarange Patil यांच्या आंदोलननांतर काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जीआरवर अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. छगन भुजबळ याविरोधात कोर्टातही जाणार आहेत. यावरच प्रतिक्रिया देताना जरांगे पाटलांनी एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलात, तर OBC आरक्षणात १९९४ साली घुसखोरी केलेल्या १६ टक्केवाल्यांच्या विरोधात आम्ही जाऊ. सन १९७९ मध्ये मोरारजी देसाई सरकारच्या काळात बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना झाली. त्यालाच मंडल आयोग म्हणतात. १९८० साली या आयोगाने दिलेल्या अहवालात देशात ३ हजार ७४३ जाती ओबींसींमध्ये असल्याचा आणि त्यांचं लोकसंख्येतली प्रमाण हे ५२ टक्के असल्याचा अहवाल दिला. ज्यामध्ये या इतर मागास वर्ग घटकाला २७ टक्के आरक्षण द्यावे ही शिफारस केली. १९८० ते १९९० या दहा वर्षात कॉंग्रेस सरकारने या शिफारसी लागू करण्यास टाळाटाळ केली. परंतु १९९० साली सत्तेवर आलेल्या जनता दलाचे पंतप्रधान व्ही.पी.सिंह आयोगाची अंमलबजावणी केली. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थांनी याला विरोध केला. मात्र हळूहळू सर्वांचा विरोध मावळला. शेवटी सर्वोच्च न्यायालयानेही ओबीसी आरक्षणावर मोहोर लावली. देशातीली सर्व राज्यांना मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्राने दिले. महाराष्ट्र हे पहिले राज्य होते ज्याने मंडळ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली. आता येऊया २३ मार्च १९९४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाने काढलेल्या जीआर वर. त्यावेळी मुख्यमंत्री होते Sharad Pawar. या GR मध्ये राज्यात असलेलं एकूण ३४ टक्के आरक्षण १६ टक्क्याने वाढवण्यात आल्याचा निर्णय होता. यामुळे राज्यात असलेल्या ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पुर्ण झाली. आता टिकणारं आरक्षण मराठा समजाला द्यायचं असेल तर घटनादुरुस्ती करावी लागेल. त्यामुळे अनेकजण तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवारांवर मराठा समाजाचा विचार न करता त्यांनी आरक्षण १६ टक्क्यांनी वाढवलं अशी टिका करतात. भाजपही Sharad Pawar, वर टिका करताना याचाच आधार घेतं. “पण प्रत्यक्षात पवारांनी २७ टक्के असणाऱ्या मंडल आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या हातात अंमलबजावणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता” असं मत Chhagan Bhujbal यांनी एका मुलाखतीत मांडलं. आता हा GR लागू होण्यापुर्वी राज्यात असणारं आरक्षण किती होतं? आणि नंतर किती झालं? यावर एक नजर टाकूया. २३ मार्च १९९४ चा हा जीआर लागू होण्यापुर्वी राज्यात अनुसुचीत जाती म्हणजे एससीसाठी होतं. 13 टक्के आरक्षण. अनुसुचीत जमाती म्हणजे एसटीसाठी होतं ७ टक्के आरक्षण. विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना होतं ४ टक्के आरक्षण आणि इतर मागास वर्ग म्हणजेचं ओबीसींना होतं १० टक्के आरक्षण. म्हणजेचं एकूण ३४ टक्के. हा २३ मार्च १९९४ चा GR लागू झाल्यानंतर एससी आणि एसटीचं असणारं १३ आणि ७ टक्के आरक्षण तसचं राहिलं. पण भटक्या विमुक्त जाती-जमाती आणि ओबीसी यांचं मिळून असणारं १४ टक्के आरक्षण वाढून झालं ३० टक्के. म्हणजेच १६ टक्के आरक्षणात वाढ करण्यात आली. यामुळेच एकूण ३४ टक्के असणारं आरक्षण आता झालं ५० टक्के. मनोज जरांगे पाटील यांच्यामते १९९४ सालच्या या वाढलेल्या जीआर मुळेच मराठ्यांवर अन्याय झाला. तथापी त्यांनी भाजप किंवा इतरांसारखी शरद पवारांवर टिका नाही केली. पण जर कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलं तर ह्या ओबीसी आरक्षणात वाढवलेल्या १६ टक्के आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाण्याच्या इशारा त्यांनी दिला. दरम्यान मध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने राज्यात मंडल यात्रा काढल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपचा डीएनए हा ओबसी आहे असं सांगणाऱ्या भाजपला किंबहुना त्याच्या ओबीसी वोटरला चुचकारण्याचा प्रयत्न यावेळी शरद पवारांनी केला होता. या यात्रेत त्यांनी कशाप्रकारे मंडल आयोगाच्या शिफारसी महाराष्ट्रात लागू केल्या. आणि ओबसींना एकूण ३० टक्के आरक्षण मिळवून दिल्याने त्यांना शिक्षणात आणि नोकरीत कसा फायदा झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला. सोबतच जेव्हा मंडळ आयोगासाठी आंदोलन होत होतं त्याच्या विरोधात भाजप कमंडल यात्रा काढत होतं. आणि OBC आरक्षण तसेच मंडळ आयोगाला विरोध करत होतं. हे ही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या यात्रेतुन केला होता. मराठा आरक्षणाच्या मुंबई आंदोलनात यावेळी त्यांच्या या मंडल यात्रेवरही सोशल मिडियावर टिका होताना पहायला मिळाली. कारण होतं त्यांच्या मुख्यंमंत्रीपदाच्या कार्यकाळात निघालेला हा OBC च्या १६ टक्के आरक्षण वाढीचा जीआर. Maharashtra Flood Relief : ३१ हजार कोटींची मदत ; पण पदरात पडणार किती? ___
Tag: Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी; 26 वर्षीय तरुणाची आत्महत्या
मराठा आरक्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकाची आत्महत्या; कुटुंबीयांनी व्यक्त केला संताप महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, आणि या संघर्षाचा आणखी एक बळी गेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली गावातील 26 वर्षीय योगेश संजय लोमटे यांनी शेतात गळफास लावून आत्महत्या केली. चिठ्ठीत लिहिले आरक्षण नसल्याचे कारण योगेश लोमटे यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून, त्यात मराठा आरक्षण मिळत नसल्याने जीवन संपवत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. ते उच्चशिक्षित होते आणि गेल्या काही वर्षांपासून नोकरीच्या शोधात होते. मात्र, आरक्षणाअभावी नोकरी मिळत नसल्याने नैराश्यात येऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. पोलीस तपास सुरू, राजकीय हालचाली गतिमान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण लढ्याची पार्श्वभूमी निष्कर्ष ही घटना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षातील आणखी एक धक्कादायक घटना आहे. आता या प्रकरणावर राजकीय हालचाली वेगाने होतील आणि आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. Search
Manoj Jarange Patil यांची मोठी मागणी, Dhananjay Munde अडचणीत?
Maratha आरक्षणासाठी लढा देणारे Manoj Jarange Patil यांनी मस्साजोग येथे भेट देऊन Santosh Deshmukh यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि मंत्री Dhananjay Munde यांच्यावर गंभीर आरोप केले. गावकऱ्यांनी Annatyag Andolan ची घोषणा केल्याने राज्य सरकारची प्रतिमा डागाळली आहे, असे Jarange Patil म्हणाले. त्यांनी सरकारवर चौकशी प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा आरोप करताना सांगितले की, ज्या आरोपींवर कारवाई व्हायला हवी, त्यांना संरक्षण दिले जात आहे. सरकारवर तीव्र आरोप Manoj Jarange यांनी सरकारवर आरोप करताना म्हटले की, एखादी मागणी केल्यानंतर सरकार फक्त चौकशीचे आश्वासन देते. मात्र, सत्ता टिकवण्यासाठी सरकार काहीही करू शकते. जर कोणी त्यांच्यासोबत नसेल, तर त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली जाते. धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप या प्रकरणात किमान 200 नावे समोर येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. तसेच, तपास यंत्रणांवर दबाव टाकला जात असून, खरी माहिती बाहेर येऊ दिली जात नाही, असेही ते म्हणाले. धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलताना त्यांनी विचारले की, “जर इतर आरोपी सहआरोपी ठरत असतील, तर मंत्री मुंडे यांना त्यातून वगळले जात आहे का?” पोलिसांवरही आरोप Manoj Jarange Patil यांनी सांगितले की, आंदोलनकर्तेच आरोपी ठरत आहेत, तर ज्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक होते, त्यांना बढती मिळत आहे. खंडणीच्या कटातून खून झाला असून, मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट आहे, असेही त्यांनी सांगितले. Santosh Deshmukh हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. Manoj Jarange Patil यांनी यावरून सरकारला लक्ष्य करत, धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. पुढे सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Maratha आरक्षण आंदोलनावर सरकारचा नवा Plan? Jarange Patil
मराठा आरक्षण नेते Manoj Jarange Patil यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकार स्वतःचे चळवळ उभी करणार आहे. सरकारचे दोन मंत्री या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची चर्चा झाल्याची माहिती एका मंत्र्याने त्यांना दिली आहे. Manoj Jarange Patil काय म्हणाले माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकार आणखी एक मराठा आंदोलन उभे करणार आहे. त्या आंदोलनात दोन मंत्री असणार आहेत. ते 12 ते 13 दिवस अमरण उपोषण करणार आहेत. त्यातील एका मंत्र्याने मला ही माहिती दिली. त्यानंतर 14 दिवसांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्यात येणार आहे. सरकार दोन मंत्र्यांना सोबत घेत नवीन मराठा आरक्षण आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे. Devendra Fadnavis मंगळवारपर्यंत आरक्षणाचा मार्ग काढतील. हैद्राबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट लागू करतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, तीन्ही गॅझेट मंगळवारपर्यंत लागू होतील अशी मला आशा आहे. शिंदे समिती कडे सात महिन्यांपासून गॅझेटचा विषय आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास झाला आहे. पंधरा दिवसांत संपूर्ण अभ्यास केला जातो. भाजपचा सुरेश धस यांच्यावर दबाव? मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी सुरेश धस यांच्यावर भाजपने दबाव टाकला होता. जर त्यांनी हे मराठा समाजाला सांगितले असते, तर जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिला असता. पण त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने मराठा समाजाच्या भावनांचा विश्वासघात झाला. त्याचबरोबर, धनंजय मुंडे आणि आमदार धस यांच्या भेटीमुळे संतोष देशमुख प्रकरणात फेरफार होण्याची शक्यता आहे. जर या प्रकरणातील आरोपी सुटले, तर सरकारसाठी हे संकट निर्माण होऊ शकते, असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Manoj Jarange Patil : ‘यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही…’ प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil : ‘यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही…’ प्रतिक्रिया लेखक: Maharashtra katta | तारीख: 04 जानेवारी, 2025 मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्याची माहिती आहे. हे दोन मुख्य आरोपी आहेत. या अटकेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आता एक काम सरकारकडून होणं गरजेचं आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सरकारने यात अजिबात हयगय करु नये. कारण यामध्ये मोठं रॅकेट आहे” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. “पुण्यातून सगळ्यांना पकडलं जातय याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्याच प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना कोण संभाळतय, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. “देशमुख बांधवाची क्रूर पद्धतीने हत्या झाली. आरोपीला संभाळण्यात यांना मोठेपणा वाटतो. हे कोण आहेत? यांना आरोपीला भाकरी द्यावीशी वाटते. आरोपीला संभाळतात. त्यांना ऐशोआराम देतात. आरोपीने कोणाच्या तरी लेकाचा, लेकीच्या बापाचा खून केलाय. तुम्ही त्यांना संभाळताय. सरकारने यांना पाठिशी घालू नये. हे रॅकेटच आहे” — मनोज जरांगे पाटील Share this post: WhatsApp Instagram Facebook Twitter