HSC Exam Result 2025 बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे आणि यामध्ये बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्येने घवघवीत यश मिळवले आहे. वैभवी देशमुखने HSC परीक्षेत 85.33% गुण मिळवले आहेत. संतोष देशमुख यांची दुर्दैवी हत्या संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या कठीण परिस्थितीत, वैभवीने बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवून दाखवले आहे. HSC Exam Result 2025 वैभवी देशमुखच्या गुणांची यादी एकूण गुण: 600 पैकी 512 वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. वैभवीचा संदेश वैभवीने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतल्यानंतर म्हटले की, “मी वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगला येईल, असा मला विश्वास आहे.” तिने आपल्या वडिलांच्या अनुपस्थितीत दुःख व्यक्त केले. HSC Exam Result 2025 HSC Result 2025: निकालाची आकडेवारी सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यंदाचा राज्याचा निकाल 91.88% लागला आहे. निकाल कुठे पाहता येणार? महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील: HSC Exam Result 2025 निकाल कसा पाहता येणार? HSC Exam Result 2025 Website Design & Development . Building impactful and user-focused online experiences.