India vs England Test 2025: Gambhir - Gil
Cricket Sport

Ind vs Eng Test 2025 : Gambhir कडून नव्या संघाला पाठिंबा

India vs England Test 2025: भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित पाच कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून प्रारंभ होत आहे. ह्या मालिकेसाठी भारतीय संघाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसतो आहे. या वेळी विराट कोहली, रोहित शर्मा, आणि आर. अश्विन यांना विश्रांती देण्यात आली असून, संघाचे नेतृत्व युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. उपकर्णधारपदाची धुरा ऋषभ पंतकडे दिला आहे.या संधीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम Gambhir यांनी संघातील नवख्या खेळाडूंना दिलेला पाठिंबा व त्यांच्या बद्दलची आशा ही सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. गंभीरकडून नव्या दमाच्या खेळाडूंना प्रोत्साहन Gambhir यांनी पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळवलेल्या अर्शदीप सिंग आणि साई सुदर्शन यांचे मनःपूर्वक स्वागत केले. अर्शदीपने त्याच्या लाल चेंडूतील खेळाने अलीकडील दौऱ्यांमध्ये चांगली छाप पाडली आहे, तर साई सुदर्शनने सातत्यपूर्ण फलंदाजीने आपले स्थान सिद्ध केले आहे. करुण नायरचं जब्बर पुनरागमन गंभीरने विशेषतः करुण नायरच्या पुनरागमनाबद्दल कौतुक केले आहे. काही काळ संघाबाहेर असलेल्या नायरने पुन्हा संघात स्थान मिळवणे हेच त्याच्या मेहनतीचं प्रमाण आहे. “पुनरागमन कधीच सोपं नसतं, पण नायरची जिद्द संघासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे गंभीर म्हणाले. नवा कर्णधार, नवी जबाबदारी शुभमन गिलकडे कसोटी संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. युवा असूनही गिलने आपल्या संयमित फलंदाजीने आणि नेतृत्वगुणांनी निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. त्याला सहकार्य करण्यासाठी ऋषभ पंत उपकर्णधार म्हणून संघात आहे. पंतचा अनुभव आणि आत्मविश्वास संघासाठी मोलाचा ठरणार आहे. Gambhir म्हणाले, “भारताचं नेतृत्व करणं ही मोठी जबाबदारी आहे. मला खात्री आहे की गिल आणि पंत दोघंही उत्कृष्ट कामगिरी करतील.” भारतीय संघाचा संपूर्ण संघ इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात नवोदित आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधण्यात आला आहे. पुढीलप्रमाणे हा संघ जाहीर करण्यात आला आहे: कर्णधार : शुभमन गिलउपकर्णधार व यष्टीरक्षक : ऋषभ पंतफलंदाज : यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डीअष्टपैलू : रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूरगोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादवअतिरिक्त यष्टीरक्षक : ध्रुव जुरेल चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या या नव्या भारतीय संघाकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. Gambhir यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाखाली हा संघ इंग्लंडच्या मातीत कसोटी मालिका जिंकण्यास सक्षम ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. RCB 2025 चे IPL जिंकली पण हे सगळ Virat Kohli च्या 18 नंबर मुळे झालं! | पहा! नेमकं गणित काय?#rcb