Solapur Collector Kumar Ashirwad
आजच्या बातम्या महाराष्ट्र

Who is Kumar Ashirwad? : शिंदे-पवारांना न जुमानणारा कलेक्टर

सोलापुरच्या पुरग्रस्थ गावात जाऊन चमकोगीरीचा प्रयत्न शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारेंना चांगलाच भोवला. Solapur Collector Kumar Ashirwad यांनी वाघमारेंना चांगलचं धारेवरं धरलं. त्याचा व्हिडिओ व्हायरलं झाला. आणि नेटकर्यांनी त्यांच्यावर तोंडसुखही घेतलं. शिंदे गटाच्या प्रवक्त्या असणाऱ्या आणि सभा गाजवणाऱ्या ज्योती वाघमारेंना नडणारे आणि उलट सवाल करणारे जिल्हाधिकारी Kumar Ashirwad यांच्याविषयीची माहीती आपण घेणार आहोत. हे तेच कलेक्टर आहेत ज्यांनी अजित दादा आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सोलापुर जिल्हात झालेल्या कॉलनंतर मुरुम उपसा करणाऱ्या गावकऱ्यांवर खटला दाखल केला होता. इतकचं नाही तर विरोधी पक्षाला सुद्धा त्यांनी थेट नडायला मागेपुढे पाहिलं नाही. कुमार आशिर्वाद. ३७ वर्ष वयाचा तरुण अधिकारी गेल्या २ वर्षांपासून सोलापूरचा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतोय. मुळचे झारखंडचे असणारे Kumar Ashirwad यांचं शालेय शिक्षण दार्जीलींग आणि जमशेदपुरला त्यांचं शालेय शिक्षण पुर्ण केलं. त्यांचं गाव इतक्या दुर्गम भागात होतं की चुकुन एखाद्या घरी लाईटची सोय होती. अशात टिव्ही, इंटरनेट लांबची गोष्ट. पुढे जाऊन आयआयटी खरगपुर मधून त्यांनी बीटेक इंजीनीअरींग पुर्ण केली. २०११ पासून प्रशासकीय सेवेत रुजु होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुरवातील सलग ४ वेळा युपीएसी मध्ये अपयश आलं. अखेर २०१६ मध्ये संपुर्ण देशात ३५ वी रॅंक मिळवत कलेक्टर होण्याचं स्वप्न साकार केलं. सोलापूर मद्ये ते २०२३ मध्ये कलेक्टर म्हणून रुजु झाले आहेत. पण त्यापूर्वी महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हात त्यांच पोस्टींग होतं. जिल्हा परिषदेचे सिईओ म्हणून त्यांनी काम पाहिलं. सोलापुरचे कलेक्टर झाल्यापासून अनेक कामांमुळे त्यांचं कौतूक झालं. त्यामद्ये पर्यटनाला चालणा देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असोत नाहीतर मंग सोलापूर मध्ये विमानसेवा सुरु होण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न यामुळे त्यांचं नेहमीच कौतुक झालं आहे. आत्ता सध्या ज्यावेळी इतिहासात पहिल्यांदा सोलापुरमध्ये नदीला पुर आलेला आहे. त्यावेळी सुद्धा त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच लोकांचा जीव वाचू शकला असं सर्वांचं मत आहे. त्यांच्या कार्यापद्धतीचं सगळीकडेच कौतुक होतं आहे. पण या सगळ्यात राजकीय नेत्यांचा अडसर नाही झाला किंवा अधिकारी असुन नेत्यांनी दमदाटी नाही केली तर नवलच. त्यामुळेच त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. एक नाही तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे नडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे. काय आहेत हे दोन्ही विषय चला समजून घेऊया. मागच्या काही दिवसात उपमुख्यमंत्री Ajit Pawar नी केलेला महिला पोलीस अधिकाऱ्याला कॉल चांगलाच व्हायरलं झाला होता. त्यामध्ये अवैध मुरुमउपशावरची कारवाई थांबवण्याची सुचना अजित पवार यांनी त्या अधिकाऱ्याला दिली होती. मिडीयाने हा विषय लावून धरल्यावर त्याचा तपास जिल्हाधिकारी Kumar Ashirwad यांच्याकडे गेला. आएएस अंजली कृष्णा यांनी दादांच्या फोन नंतर कारवाई थांबवलीही होती. मात्र यानंतर तपासात जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी हा मुरुम उपसा अवैध असल्याचच सांगीतलं. आणि याच्यामुळेच गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकप्रकारे दादांनी केलेला फोन आणि कारवाई थांबवण्याच्या सुचना गैर असल्याचं यातून समोर येत होतं. म्हणजे आपल्या प्रशासकीय ताकदीचा वापर करुन इथे अजित दादांना अप्रत्यक्षपणे नडण्याचाच प्रयत्न याठिकाणी त्यांनी केला होता. अशात आता सोलापूर मद्ये पुराने थैमान घातल्यानंतर परिस्थिती हाताळताना त्यांना राजकीय नेंत्यांच्या दबावालाही सामोरं जावं लागत होतं. अशात जिल्हाचे पालकमंत्री भरणे मामांनीही उंदरगावच्या लोकांना सुविधा कसकाय पोहोचल्या नाहीत म्हणून मिडीयासमोर कॉल करुन त्यांना झापलं. त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एका पुरग्रस्त गावात २०० किटचं वाटप करण्यासाठी आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या यांनी कलेक्टर कुमार आशिर्वाद यांना सर्वांसमोर फोन लावला, तो स्पिकर वर ठेवला आणि त्याची व्हिडिओही रेकॉर्डींग सुरु होती. तुम्ही लोकांना जास्त पैशाची मदत द्या. लगेच जेवण पोहोच करा. असं सांगणाऱ्या वाघमारेंना तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत का करत नाही. आम्ही इथं काम करत आहोत. तुमचं राजकारण मध्ये आणु नका. २०० किटने काय होतं. तिथं लोकं किती आहेत. असा प्रतिसवालच त्यांनी केला. सहसा कोणत्याही अधिकाऱ्याकडून अशी भाषा कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांसाठी वापरली जात नाही. मात्र मी कलेक्टर आहे माझं तुम्ही ऐकुन घ्या म्हणत कुमार आशिर्वाद यांनी ज्याोती वाघमारेंची बोलतीच बंद केल्याचं व्हिडिओत दिसुन येत आहे. या व्हिडिओमुळे त्या इतक्या ट्रोल झाल्या की त्याच्यावर एक दुसरा व्हिडिओ बनवून त्यांना पोस्ट करावा लागला. माध्यमांनी चमकोगीरी करणाऱ्या वाघमारेंना कलेक्टरांचे खडेबोल अशा मथळ्याच्या बातम्या पोस्ट केल्या. थोडक्यात काय तर अजित दादांची राष्ट्ववादी असो नाहीतर शिंदेंची शिवसेना या कलेक्टर साहेबांनी कुणालाच सुट्टी दिली नाही. एवढंच काय विधानसभेनंतर ज्या मारकडवाडीचं प्रकरण मतचोरी झाली म्हणून विरोधीपक्षाने उचलुन धरलं होतं. तेव्हा कलेक्टर असणाऱ्या Kumar Ashirwad यांनी पत्रकार परिषद घेऊन. तुम्हाला आक्षेप होता तर तुमचे निवडणून प्रतिनिधी मतदान केंद्रावर मोजणीच्या वेळी असताना तुम्ही का नाही घेतला. शिवाय तुम्हाला मोजणीवर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे पण बॅलेट पेपर किंवा कशीही निवडणूक घेण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे. असं स्पष्टपणे सुनावत, तुमच्याकडे पुरावे असले तर आणा. असा दावाही त्यांनी केला होता. Jyoti Waghmare Viral Video : ज्योती वाघमारे बरोबर की सोलापुरचे कलेक्टर Kumar Ashirwad

The final phase of Samruddhi Mahamarg
आजच्या बातम्या

Samruddhi Mahamarg चा अंतिम टप्पा पूर्ण, 61 हजार कोटींचा प्रकल्प

महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे Samruddhi Mahamarg. देशातील सर्वात लांब आणि अत्याधुनिक महामार्गांपैकी एक असलेल्या या प्रकल्पाचा अखेरचा म्हणजेच चौथा टप्पा इगतपुरी ते आमणे या दरम्यानचा रस्ता पूर्ण झाला आहे. यामुळे आता एकूण 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. या महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यातील अह्वानपाटी वरून Ajit Pawar यांनी माहिती दिली की, हा प्रकल्प साकारण्यासाठी तब्बल 12 कोटी cement bags व 7 लाख metric ton steel चा वापर करण्यात आला आहे. सुरुवातीला अपेक्षित खर्च 55,500 कोटी होता, मात्र प्रत्यक्षात हा खर्च 61,000 crore रुपयांवर गेला आहे. विकासाचा राजमार्गसमृद्धी महामार्गाला Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg नौक देण्यात आलं आहे. याचा मुख्य उद्देश नागपूर ते मुंबई प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी करणे, औद्योगिक विकासाला चालना देणे आणि पर्यावरणपूरक उपायांनी राज्याला नवा चेहरा देणे हा होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींचा सहभागया महामार्गाच्या कल्पना तत्काळ मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी दिला. आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री असतांना याच प्रोजेक्टचा अखेरचा टप्पा पूर्ण होतांना पाहणे, हे एक अनोखं संयोग असल्याचं Ajit Pawar यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या योगदानाबद्दलही त्यांनी विशेष उल्लेख केला. “आमच्या Audi गाडीचे सारथ्य एकनाथ शिंदे यांनी केलं. मी फक्त बघत होतो की सगळं व्यवस्थित आहे की नाही,” असं मिश्कीलपणे Ajit Pawar म्हणाले. इंधन बचत आणि वेळेची बचतप्रवाशांना या महामार्गामुळे केवळ वेळेचीच एकपेक्षा protester मिरãच बहुतवजा आनी बचत सुद्धा होणार आहे. Nashik ते Mumbai या अंतराने आता केवळ काही तासांत पार करता येईल. महामार्गाच्या गती मर्यादा 120 किमी/तास असतानाही बोगद्यात ती गती 100 किमी/तास याबद्दल अजितदादांनी एक गमतीशील किस्सा सांगितला. फडणवीसांनी कार चालवीत असतांना 120 किमी/तास वेग जोडला आणि नियमांचं पालन केल्याचंही त्यांनी सांगितलं. रोजगार आणि औद्योगिकीकरणSamruddhi Mahamarg हा प्रकल्प केवळ रस्ते विकासापुरता मर्यादित नाही. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना औद्योगिक झोन, लॉजिस्टिक पार्क्स, शहरविकास होण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. विरोध आणि भूसंपादनAjit Pawar यांनी सांगितलं की, या प्रकल्पाला सुरुवातीला अनेकांनी विरोध केला. पण जेव्हा भूसंपादनासाठी भरघोस दर जाहीर करण्यात आले, तेव्हा विरोध करणाऱ्यांनीही ती जमीन विकली. हा विरोध आणि त्यामागचा राजकीय खेळही त्यांनी स्पष्ट केला. पर्यावरणपूरक प्रकल्पपर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर हे लोकार्पण होणं हे एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे. महामार्ग बांधताना पर्यावरण पूरक उपाय, वृक्षारोपण, जलसंधारण प्रकल्प यांचा समावेश करण्यात आला आहे. Samruddhi Mahamarg हा केवळ एक महामार्ग नाही तर तो एक विकासाचा राजमार्ग आहे. 61 हजार कोटींचा खर्च, भव्य संरचना, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उभारलेला हा महामार्ग महाराष्ट्राला एक नवी दिशा देईल, हे नक्की. Ajit Pawar यांच्या मिश्कील भाषणात seriousness आणि commitment दोन्ही असतात. मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि Eknath Shinde यांच्या सहकार्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाला यशस्वीपणे पूर्ण केले. Political Twist: फडणवीसांची हिंट पण अजित पवार – सुप्रिया सुळे एकत्र? NCP Pawar vs Pawar Over?

Kunal Kamra's post created a stir
आजच्या बातम्या

Kunal Kamra च्या पोस्टने माजवली खळबळ – कलाकाराला गप्प करण्याचा हा नवा फॉर्म्युला?

स्टँडअप कॉमेडियन Kunal Kamra पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत आणि मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. पण त्याही परिस्थितीत कुणालने आपली भूमिका स्पष्ट करत सोशल मीडियावर एक स्फोटक पोस्ट लिहिली. कुणाल कामराची नवीन पोस्ट – कलाकारांना गप्प बसवण्याचा मार्गदर्शक? कुणालने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की कलाकाराला गप्प करण्यासाठी काही टप्पे पाळले जातात –1️⃣ आक्रोश: कलाकारांच्या जाहिराती आणि ब्रँड डील्स बंद करा.2️⃣ मोठा आक्रोश: खासगी आणि कॉर्पोरेट शो कॅन्सल करा.3️⃣ हिंसक प्रतिक्रिया: कलाकारांची मोठमोठी ठिकाणं त्यांना बुकिंग देण्यास नकार देतील.4️⃣ दहशत वाढवा: छोट्या ठिकाणीदेखील कलाकारांसाठी बंद करा.5️⃣ प्रेक्षकांवर दबाव: कलाकाराच्या चाहत्यांवर चौकशी सुरू करा. “आता कलाकारांसाठी दोनच पर्याय उरले – एकतर मौन बाळगायचं किंवा आपला आत्मा विकायचा.” अशी थेट टिप्पणी करत कुणालने या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलीस घराच्या शोधात – पण कुणाल आधीच तामिळनाडूत? सोमवारी मुंबई पोलिसांचं पथक कुणालच्या माहीम येथील घरी गेलं, पण तो तिथे राहत नसल्याचं स्पष्ट झालं. त्यावर त्याने तामिळनाडूमधील घराच्या टेरेसवरचा फोटो पोस्ट करत पोलिसांच्या वेळेचा अपव्यय झाल्याचा टोला लगावला. कुणाल कामराच्या पोस्टवर समाजमाध्यमात प्रतिक्रिया – स्वातंत्र्य की दडपशाही? कुणालच्या या पोस्टवर नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक त्याच्या बाजूने आहेत, तर काहींना वाटतं की तो मुद्दाम वाद ओढवून घेत आहे. पण एक गोष्ट नक्की – कुणालच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा कलात्मक स्वातंत्र्य आणि राजकीय दडपशाही यावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

Rahool Kanal
आजच्या बातम्या

Rahool Kanal: Shiv Sena नेता ज्यांनी कुणाल कामरा विवादानंतर स्टुडिओ हल्ला केला

मुंबई पोलिसांनी सोमवारी शिवसेना कार्यकर्ता राहूल कणाल आणि इतर ११ जणांना Habitat Studio वर हल्ला केल्याप्रकरणी अटक केली. हे स्टुडिओ कुणाल कामरा यांनी त्यांचा नवीन व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरले होते, ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “गद्दार” (द्रोही) असे संबोधले होते. Rahool Kanal, Shiv Sena नेता ज्यांनी कुणाल कामरा विवादानंतर स्टुडिओ हल्ला केला एक प्रसिद्ध युवा नेता, याने हल्ल्याचा नेतृत्व केला होता, जो कामरा यांच्या एकनाथ शिंदेवर केलेल्या पॅरडी गाण्यावर केलेला होता. कणालने त्याच्या कृतीचे समर्थन करतांना चेतावणी दिली, “हे फक्त ट्रेलर आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल किंवा आमच्या वयस्कर नेत्यांबद्दल अपशब्द बोलले, तर आम्ही त्यांना सोडणार नाही. जेव्हा कधी तुम्ही [कुणाल कामरा] मुंबईत येता, तेव्हा तुम्हाला शिवसेना स्टाईलमध्ये एक चांगला धडा शिकवला जाईल.” राहूल कणाल कोण आहेत? राहूल कणाल एक सामाजिक कार्यकर्ते आणि philanthropist आहेत. त्यांनी २००५ मध्ये मुंबई विद्यापीठातून वाणिज्य विषयात पदवी घेतली. कणाल हे शिवसेना (UBT) चे आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी होते आणि ते १० वर्षांहून अधिक काळ शिवसेनेच्या युवा विभागात, ‘युवा सेना’मध्ये सक्रिय होते. जुलै २०२३ मध्ये राहूल कणाल यांनी शिवसेना (UBT) सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आणि ‘युवा सेना’च्या महासचिवपदी नियुक्त झाले. त्यांनी ‘आय लव्ह मुंबई’ फाऊंडेशनची स्थापना केली आहे आणि त्या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनाही श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचा ट्रस्टी म्हणून कार्य केले आहे. राहूल कणाल ‘भाईजान्ज रेस्टॉरंट’चे मालक आहेत, जे बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या नावावरून ठेवलेले आहे.

Kunal Kamra and Eknath Shinde
Trending आजच्या बातम्या

Kunal Kamra आणि एकनाथ शिंदे गटाचा वाद, कविता आणि तोडफोड: राजकीय वर्तुळात खळबळ

स्टँडअप कॉमेडियन Kunal Kamra पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. यावेळी त्याने आपल्या स्टॅन्डअप शोमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता सादर केली. या कवितेचा विषय एकनाथ शिंदे यांच्या राजकीय निर्णयांवर आणि शिवसेनेतून भाजपसोबत युती करण्यावर होता. कामराच्या या कवितेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुणाल कामराने 23 मार्च 2025 रोजी ‘नया भारत – अ कॉमेडी स्पेशल’ या शोमध्ये आपली कविता सादर केली. या कवितेत त्याने शिंदे यांच्यावर तीव्र टीका करत त्यांना “गद्दार” असे संबोधले आहे. कविता सादर करतांना त्याने महाराष्ट्रातील 2022 च्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले, जेव्हा शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपसोबत हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारले. कामरा हा त्याच्या तिखट आणि बिनधास्त राजकीय व्यंगासाठी ओळखला जातो. त्याने याआधी देखील अनेक राजकीय नेत्यांवर आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून टीका केली आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि त्याच्या व्हिडिओंना मोठा प्रतिसाद मिळतो. कामरा हा आपल्या “Shut Up Ya Kunal” या यूट्यूब पॉडकास्टसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्यात राजकीय नेत्यांशी गप्पा मारताना तो अनौपचारिक शैलीत चर्चेस भाग घेतो. कामरा हे अनेकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टसाठी वादात ओढले जातात. 2018 मध्ये त्यांच्या काही ट्विट्समुळे वाद निर्माण झाला होता, त्यानंतर त्यांनी आपले ट्विटर अकाउंट डिलीट केले होते. तसेच, 2019 मध्ये त्यांना कार्यक्रम उधळण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या. यावेळी कामरा याच्या कवितेने शिंदे गटाला चांगलेच संतप्त केले आहे. शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात शिवसैनिक खुर्च्या, टेबल आणि लाइट्स तोडताना दिसत आहेत. दुसरीकडे, ठाकरे गटाने या कवितेचे स्वागत केले आहे. संजय राऊत यांनी कामराच्या कवितेला “कमाल” असे म्हटले असून शिंदे यांच्याविरुद्धच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, शिंदे यांनी शिवसेनेची मूलभूत विचारधारा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सोडून सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी केली. कुणाल कामराची कविता केवळ एक व्यंग्य न राहता महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे आणि शिंदे गटांमधील संघर्षाला नवे वळण देणारी ठरली आहे. एकीकडे शिंदे गट आक्रमकपणे कारवाईची मागणी करत आहे, तर ठाकरे गटाने या कवितेचा वापर शिंदे यांच्याविरुद्ध प्रचारासाठी सुरू केला आहे. शिंदे गटाने कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. कामरावर मानहानी किंवा प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवला जाऊ शकतो. मात्र, कामराने आपल्या X हॅण्डलवरून संविधानाच्या प्रतीसोबतचा फोटो टाकत पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, असे म्हटले आहे. यापूर्वीच्या वादांप्रमाणे तो आपल्या मतांवर ठाम राहतो की माफी मागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Disha Salian Death Case:
Bollywood आजच्या बातम्या

Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या मृत्यूसंबंधी नवा खुलासा तिच्या मित्राने सांगितला घटनाक्रम

Disha Salian मृत्यू प्रकरण, ज्यामध्ये सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन यांचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला, पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे. सतीश सालियन आता मृत्यूच्या बाबतीत हत्या झाल्याचा गंभीर आरोप करत आहेत. ८ जून २०२० च्या रात्री नेमके काय घडले? दिशा सालियनच्या मित्राने एका व्हॉट्सऍप ग्रुपवर त्या रात्री घडलेला घटनाक्रम शेअर केला होता. ८ जून २०२० रोजी दिशा सालियनच्या घरात तिच्या मित्रांसह आणि प्रियकरासोबत पार्टी सुरू होती. पार्टीत दिशा मद्यपान करत होती आणि ती तिच्या करिअरवर निराश होती, अशी माहिती दिली गेली आहे. दिशा वारंवार म्हणत होती, “माझ्या कोणालाही काळजी नाही,” असे ती मित्रांना सांगत होती. काही वेळाने ती अचानक तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. मित्रांनी आणि प्रियकराने दरवाजा ठोठावला, परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यानी दरवाजा तोडला. तेव्हा दिशा बाल्कनीतून खाली पडलेली दिसली. त्यानंतर मित्रांनी तातडीने दिशाला रुग्णालयात दाखल केले, पण त्यावेळी डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. दिशाच्या मृत्यूचा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येशी संबंध? सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या झाल्यानंतर काही लोकांनी दिशा सालियनच्या मृत्यूचे सुशांतच्या मृत्यूशी जोडले. भाजपाचे नेते नारायण राणे यांनी असा आरोप केला होता की दिशा सालियनवर बलात्कार झाला आणि तिचा खून करण्यात आला. दिशाने सुशांतला या अत्याचाराची माहिती दिली होती, असेही ते म्हणाले. त्यानंतर सुशांतला धमक्या दिल्या जात होत्या, असे सांगितले गेले. १३ जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे या दोन घटनांचा संबंध जोडला गेला. तपास आणि नवीन घडामोडी २०२१ मध्ये पोलिसांनी तपास पूर्ण करत सांगितले की या प्रकरणात कोणतीही संशयास्पद बाब सापडलेली नाही. त्यानंतर, डिसेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारने तीन सदस्यांची एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, एसआयटी अहवाल अद्याप राज्य सरकारला मिळालेला नाही. पोलिसांनी केलेल्या तपासणीत दिशा राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेज तपासलेल्या. त्यात काही वेगळी बाब समोर आलेली नाही. त्याच रात्री दिशा केवळ एकदाच इमारतीबाहेर बाहेर आली होती, आणि ती पार्सल घेण्यासाठी खाली गेली होती. तसेच, ती गर्भवती असल्याचा दावा उत्तरीय तपासणीत खोडला गेला होता.

Disha Salian Case:
आजच्या बातम्या ताज्या बातम्या

Disha Salian Case: Aditya Thackeray ला Shinde आणि Ajit Dada गटाकडून समर्थन

Disha Salian च्या मृत्यूप्रकरणाची चर्चा एकदां पुन्हा सुरू झाली आहे, ज्यात नव्या आरोपांचा समावेश आहे आणि तपासाची पुनर्रचना करण्याची मागणी करण्यात आली आहे. Disha चे वडील, सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण गरम झालं आहे, परंतु अनपेक्षितपणे शिंदे आणि अजित दादा गटातील दोन मोठे नेते आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. Disha Salian प्रकरणात नवीन काय घडले? Disha सालियनचे वडील, त्यांच्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावर भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदे गट आणि अजित दादा गटाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्या बचावात आपला आवाज उठवला आहे. आदित्य ठाकरे यांना शिंदे आणि अजित दादा गटाकडून समर्थन Sanjay Gaikwad, Shinde गटाचे प्रमुख नेते, म्हणाले की, Disha च्या मृत्यूप्रकरणात CID तपासात कोणत्याही राजकीय नेत्यांचा सहभाग नाही. त्यांनी सांगितले की, तपासात आदित्य ठाकरे यांना क्लिन चिट देण्यात आली होती कारण त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही. “आता तीन वर्षं शिंदे गटाचं सरकार आहे, यावरून कोणतेही नवीन पुरावे समोर आले नाहीत,” असे त्यांनी म्हटले. अमोल मिटकरी यांचे विचार Ajit Dada गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या नव्या याचिकेवर गंभीर शंका उपस्थित केली. त्यांचा प्रश्न आहे की, इतक्या वर्षांनंतर याचिका का दाखल केली गेली आणि राज्यात आणि देशात इतर मुद्द्यांवर राजकारण का चालवलं जात आहे? त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याऐवजी Disha Salian प्रकरणाला हवा देऊ नये. रोहित पवार यांचे आदित्य ठाकरे समर्थन NCP नेते रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना स्पष्टपणे समर्थन दिले. त्यांचा विश्वास आहे की आदित्य ठाकरे यांचा Disha Salian च्या मृत्यूसोबत काहीही संबंध नाही. “भाजप या प्रकरणात राजकारण करत आहे, आणि याचा उद्देश आगामी बिहार निवडणुकांमध्ये फायदा मिळवणे आहे,” असे पवार यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, “आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आणि तपासाने ते सिद्ध केलं आहे.”

Eknath shinde live
आजच्या बातम्या महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर थेट निशाणा – “जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा!”

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “औरंगजेब जितका क्रूर होता, तितकेच फडणवीसही क्रूर आहेत” असे विधान केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या विधानावर टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदेंचा सपकाळ यांना प्रत्युत्तर: “ज्या औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याची तुलना तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करता? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून काम करतो. आम्ही राज्यासाठी लोकाभिमुख योजना आणल्या, विकासाची गती वाढवली. आमच्या कार्याची पोचपावती म्हणून जनतेने आम्हाला लँडस्लाईड मँडेट दिले. मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस आणि आम्ही टीम म्हणून काम करत आहोत.“ “कुठे औरंगजेब आणि कुठे देवेंद्र फडणवीस? अशी तुलना करण्यापूर्वी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी होती,” असे शिंदे म्हणाले. औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर संताप: “औरंगजेबाने महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तो देशद्रोही होता. त्याचं समर्थन करणारा कोणताही भारतीय देशभक्त असू शकत नाही. मग काँग्रेस नेते हे समर्थन का करत आहेत? यांचा औरंगजेब कोण लागतो? नातेवाईक आहे का? सगासोयरा आहे का?” असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला. औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला: औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग माजले असून “ही कबर उखडून काढा” अशी मागणी सत्ताधारी गटातून होत आहे. नागपुरात या मुद्यावरून हिंसाचार, दगडफेक आणि पोलिसांवर हल्ला झाला आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. 📌 महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापलेले असून, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Crime India Pune Pune महाराष्ट्र

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने घेतली एकनाथ शिंदे यांची भेट, कठोर शिक्षेची मागणी

स्वारगेट बलात्कार प्रकरण: पीडितेने सरकारकडे न्यायाची मागणी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणात पीडितेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची विधान भवनात भेट घेतली. पीडितेची मागणी: आरोपीला कठोर शिक्षा हवी! या भेटीत एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी पीडितेची तब्येत विचारून तिच्या व्यथेला ऐकून घेतले. यावेळी पीडितेने आरोपीला शक्य तितक्या लवकर कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली. सरकारकडून न्यायाची ग्वाही पीडितेची व्यथा ऐकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तिला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच, राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. घटनेचा संक्षिप्त आढावा या भेटीनंतर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्वरित कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या प्रकरणात पीडितेला न्याय मिळेल का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

योजना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी दिलासा, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

सरकारने Ladki Bahin Yojana अशा महिलांसाठी सुरू केली आहे, ज्या कुटुंबांचे annual income 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. या scheme संदर्भात मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या bank account मध्ये दर महिन्याला ₹1500 जमा केले जातात. आतापर्यंत सात हप्ते लाभार्थींना दिले गेले आहेत आणि आता February installment देखील वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. जेव्हा Ladki Bahin Yojana सुरू झाली, तेव्हा काही eligibility criteria ठरवण्यात आले होते. मात्र, काही women जे या निकषात बसत नव्हत्या, त्यांनी देखील अर्ज केले आणि फायदा घेतला. ही बाब government च्या लक्षात आल्यानंतर, अशा अपात्र महिलांची verification सुरू झाली आणि त्यांची नावे scheme मधून वगळण्यात आली. आतापर्यंत 5 लाख अपात्र महिलांना योजनेतून हटवण्यात आले आहे. यावरून opposition ने सरकारला धारेवर धरले आणि scheme बंद होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र, या चर्चांवर Eknath Shinde यांनी पूर्णविराम देत सांगितले की Ladki Bahin Yojana बंद होणार नाही. त्यांनी असा टोलाही लगावला की, “लाडक्या बहिणींच्या विरोधात जाणाऱ्यांना माझ्या बहिणींनी जोडा दाखवला आहे!” यावेळी Shinde यांनी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. “हा ऐतिहासिक विजय आहे. तुमच्या आशिर्वादाने 232 जागांवर विजय मिळवला. मी संपूर्ण महाराष्ट्र पायाला भिंगरी लावून फिरलो. फक्त भंडारा मतदारसंघाला ₹3500-4000 कोटींचा निधी मंजूर केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदीजी महान आहेत म्हटलं तरी काही लोकांना जळतं. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरीही यांना पोटदुखी होते!” असेही ते म्हणाले.