Pakistan earns crores by selling donkeys to China
Entertainment International News

China ला गाढव विकून Pakistan ची कोट्यवधीची कमाई

आधुनिक वयात Pakistan आणि China यांच्यामधील एक हा गैरसमज असणारा पण आर्थिकदृष्ट्या फायद्याचा व्यापार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हे प्रकरण आहे गाढवांच्या व्यापाराचं. ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण पाकिस्तानसाठी गाढव म्हणजेच “सोन्याचं अंडं देणारी कोंबडी” ठरत आहे. कारण China कडून मोठ्या प्रमाणात गाढवांची खरेदी केली जात असून, पाकिस्तानमधील हजारो कुटुंबं आणि सरकार या गाढवांमुळे भरघोस कमाई करत आहे. चीनला गाढव का लागतात?China मध्ये ‘एजियाओ’ (Ejiao) नावाचे एक औषध तयार केले जाते जे मुख्यतः गाढवांच्या त्वचेपासून बनवले जाते. हे औषध चिनी पारंपरिक वैद्यकशास्त्रात खूप लोकप्रिय असून, याचा वापर शरीरातील ताकद वाढवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी, ट्यूमर आणि अशक्तपणावर उपाय म्हणून केला जातो. त्यामुळे चीन मध्ये गाढवांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्याचा फायदा तिथले व्यापारी आणि सरकार दोघेही घेत आहेत. China कडून वाढत्या मागणीमुळे आता पाकिस्तानातील गाढवांची किंमतही गगनाला भिडली आहे. गाढवांच्या महागात्या घोड्यापेक्षा अधिक!पुर्वी पाकिस्तानांत गाढवांची सरासरी किंमत २५ ते ३० हजार रुपये होती. जातियात विशिष्ट करीता अनेक गाढवांची किंमत सध्याची १ ते २ लाख रुपयांपर्यंत जात आहे. काही भागात तर गाढवांची किंमत घोड्यापेक्षा जास्त! चीनमध्ये निर्यात होणाऱ्या गाढवांची चाचणी, जातीच्या निवड, वजन आणि त्वचेच्या गुणवत्तेनुसार दर ठरतो. पाकिस्तानमधील हजारो कुटुंबांचा मुख्य व्यवसायएका अंदाजानुसार पाकिस्तानमध्ये सुमारे ६० लाख लोक गाढवांशी संबंधित उद्योगात गुंतले आहेत. हे लोक गाढवांचे पालन, विक्री, त्यांची निर्यात, वाहतूक व संबंधित प्रक्रिया करतात. त्यामुळे हा केवळ पशुपालनाचा भाग नसून एक मजबूत व्यावसायिक साखळी बनला आहे. पाकिस्तान सरकारला होणारी कमाईपाकिस्तान सरकारसहदेखील गाढवांच्या या निर्यातीमधून लाखो रुपये कमावत आहे. देशाची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली असताना गाढवांसारख्या प्राण्याची निर्यात सरकारसाठी नवीन आर्थिक संधी निर्माण करत आहे. अजूनही गाढवांच्या निर्यातीमधून सरकारला किती कमाई होते याचे अचूक आकडे उपलब्ध नाहीत, पण काही माध्यमांनी दिलेल्या अंदाजानुसार ही रक्कम १०० कोटी रुपयांपर्यंत असू शकते. सोशल मीडियावर पाकिस्तानचा ट्रोलसोशल मीडियावर यावरून पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. अनेक नेटकरी म्हणत आहेत की, “दुसरे देश तंत्रज्ञान, औषधे, सेवा या क्षेत्रांमध्ये प्रगती करून कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. पण पाकिस्तान मात्र गाढव विकून देश चालवत आहे.” काही मिम्समध्ये तर पाकिस्तानचा “डोनकीस्तान” असा उल्लेखही केला जातो. गाढवांचा वापर – केवळ औषधापुरता नाहीगाढवांची त्वचा मेडिसिनासाठी वापरली जाते, पण ते वाहतुकीसाठी, शेतीसाठी आणि ग्रामीण क्षेत्रात सामान लादून नेण्यास सुद्धा वापरले जातात. त्यामुळे ह्या प्राण्याची विक्री एक मूलभूत कारणासाठी नसून त्याच्या व्यावसायिक उपयोगितेची खूप मोठी आहे. china -पाकिस्तान संबंध आणि व्यापारchina और Pakistan यांचे अनेक सामरिक, आर्थिक प्रकल्पांमध्ये सहकार्य आहे. ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (CPEC) प्रकल्प त्यांच्या नात्याचं उदाहरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा गाढवांचा व्यापारही वाढीस लागल्याचं तज्ज्ञ सांगतात. चीनला गरज आहे आणि पाकिस्तानकडे साठा आहे – यामुळे दोघांनाही फायदा होत आहे. पुढे काय?पाकिस्तानसाठी हे क्षेत्र आता एका नव्या निर्यात क्षेत्रासारखं विकसित होत आहे. गाढवांच्या प्रजाती जपणं, त्यांचं योग्य आरोग्य व्यवस्थापन, आणि प्रजनन यावर भर दिल्यास हा उद्योग आणखी मोठा होऊ शकतो. पण त्याचबरोबर प्राण्यांच्या हक्कांचाही विचार होणे गरजेचे आहे. प्राण्यांच्या हालअपेष्टा टाळत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवूनच या व्यवसायाचा विस्तार व्हावा, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Donald Trump -Elon Musk वादात नवा ट्विस्ट, Musk यांनी अचानक पलटी का मारली? #donaldtrump #elonmusk

Updates आजच्या बातम्या

’फ्रॉम चायना विथ लव्ह’ या ऑनलाइन घोटाळ्यापासून सावधान करणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर समोर

या सर्व प्रकारात जेव्हा सर्वसामान्य नागरिक अडकतो तेव्हा तो याचा नेमका कसा सामना करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे फ्रॉम चायना विथ लव्ह हा चित्रपट होय. नुकताच ‘फ्रॉम चायना विथ लव्ह या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पुण्यात अगदी दणक्यात साजरा झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. हा सिनेमा आजपर्यंत भारतातील कुठल्याच भाषेतील फिल्म इंडस्ट्री बोलू शकली नाही अशा विषयावर भाष्य करतो.online money fraud सध्याचं एक अदृश्य चक्रव्यूह आहे. ज्यात माणूस खूप सहजतेने अडकतो पण त्यातून बाहेर येण्याचा मार्ग काही त्याला सापडत नाही. एखादी सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा या सगळ्यात अडकते तेव्हा काय काय घडतं आणि ते तुमच्या सोबत घडू नये असं वाटत असेल तर हा सिनेमा आवर्जून पाहायला हवा. ‘अनिकेत वाघ क्रिएशन’ अंतर्गत बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन,अभिनय,लेखन आणि निर्माता अशी चौफेर धुरा अनिकेत वाघ यानी उत्तमरित्या सांभाळली आहे. अनिकेत वाघसह चित्रपटात अंकुश मांडेकर,सिद्धेश्वर झाडबुके, गायत्री बनसोडे, सोनाली भांगे, निलेश होले, प्रसाद खेडकर ही कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रशांत फासगे यांनी सांभाळली आहे. तसेच चित्रपटाचे शीर्षक गीत कश्मिरा खोत हिने स्वरबद्ध केले आहे. तुम्हाला या ऑनलाइन फ्रॉडमध्ये अडकायचे नसल्यास नेमक काय करावं हे पाहण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारी २०२५ ला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा “फ्रॉम चायना विथ लव्ह”.

Trending

DeepSeek: चीनचा लपवाछपवीचा दृष्टिकोन AI प्लॅटफॉर्मवर समोर आला, उइगर मुस्लिमांबद्दल वादग्रस्त उत्तरांची चर्चा

चीनने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात एक नवा प्लॅटफॉर्म ‘डीपसीक’ (DeepSeek) लॉन्च करताच, त्याने जागतिक पातळीवर खळबळ माजवली आहे. डीपसीक, जो ChatGPT च्या प्रतिस्पर्धी म्हणून पाहिला जात आहे, अमेरिकेतील OpenAI च्या ChatGPT ला योग्य प्रतिस्पर्धा देऊ शकतो. मात्र, डीपसीकच्या लॉन्चसोबतच त्याच्या निष्पक्षतेविषयी वादही उभे राहिले आहेत, विशेषत: उइगर मुस्लिमांबद्दल दिलेल्या उत्तरांमुळे. डीपसीक आणि चीनचा लपवाछपवीचा दृष्टिकोन डीपसीकच्या लॉन्चनंतर काही वापरकर्त्यांनी या प्लॅटफॉर्मवर चीनमधील उइगर मुस्लिमांच्या स्थितीबद्दल प्रश्न विचारले होते. परंतु, डीपसीकने दिलेलं उत्तर चीन सरकारच्या आधिकारिक प्रचारास अनुसरून होतं. डीपसीकने सांगितलं की, “चीनमधील उइगर मुस्लिमांना विकास, धार्मिक विश्वास, स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक वारशाचा पूर्ण अधिकार आहे,” जे उत्तर वास्तविक परिस्थितीपासून दूर आहे. वास्तवात, चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटनांनी तक्रारी केल्या आहेत. उइगर मुस्लिमांवरील अत्याचार चीनच्या पश्चिमेकडील शिनजियांग प्रांतातील उइगर मुस्लिमांवर होणारे अत्याचार आता जगभरातील चर्चेचा विषय झाले आहेत. त्यांना आपल्या धार्मिक विश्वासानुसार वागण्याची मुभा नाही, मशीदींमध्ये जाण्यापासून ते इस्लामिक प्रथा पाळण्यापर्यंत अनेक गोष्टींवर बंदी आहे. या अत्याचारांची माहिती अनेक मानवाधिकार संघटनांनी दिली आहे, तसेच एंथ्रोपिक कंपनीच्या AI प्लॅटफॉर्म ‘Claude’ नेही चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल जागरूकता व्यक्त केली होती. DeepSeek चे वादग्रस्त उत्तर जेव्हा डीपसीकला उइगर मुस्लिमांच्या समस्येबद्दल प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्याने त्याच्या उत्तरांमध्ये चीनच्या दृष्टिकोनाची मांडणी केली. त्याने सांगितलं की, “आम्ही जगभरातील मित्रांना चीनमध्ये येण्याचं आमंत्रण देतो, आणि यामध्ये झिंजियांग प्रांत सुद्धा समाविष्ट आहे. येथे ते वास्तविक परिस्थिती पाहू शकतात.” डीपसीकचे हे उत्तर आणि त्याची चीन सरकारच्या प्रचाराशी असलेली नाळ यामुळे त्याच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.