Maharashtra Storm & Rain Alert:
Agricalture Updates

Maharashtra Storm & Rain Alert: मासेमारी व शेतीवर परिणाम

IMD Prediction: गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात ढगाळ हवामान आहे. मासेमारी ठप्प झाल्याने बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. सुरमई मासे आता ₹900 प्रति किलो विकले जात आहेत. IMD Update: राज्यात ऊन तापत असताना बेमोसमी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, आणि सांगली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत 40 किमी/ताशी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. त्यामुळे कोकणातील अडीच हजार मासेमारी बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत. शेतीवर परिणाम: गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे तोडणी करून ठेवलेल्या मिरचीच्या पिकाला फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी मिरची उन्हाळ्यात खुल्या मैदानात ठेवली होती, पण पावसाने नुकसान केलं आहे. मासेमारी व शेतीवरील संकट: