अभिनेत्री Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन यांचे नाते काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र, या चर्चांमध्ये एक गोष्ट आठवण्यासारखी आहे. एक काळ असा होता की, ऐश्वर्या रायला एक मोठा उद्योगपती लग्नासाठी पसंती होता – तो म्हणजे सबीर भाटिया. कोण आहेत सबीर भाटिया? सबीर भाटिया हे एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी 1996 मध्ये आपल्या मित्र जॅक स्मिथ सोबत हॉटमेलची स्थापना केली. 1998 मध्ये त्यांनी हॉटमेल ही कंपनी 3300 कोटींना बिल गेट्सला विकली. आज ती कंपनी आऊटलूक म्हणून ओळखली जाते. सध्या ते एआय आणि क्लीन फैनेटिक्समध्ये काम करत आहेत. ऐश्वर्या राय आणि सबीर भाटियाचे कनेक्शन सबीर भाटिया फक्त एक उद्योगपतीच नाही, तर बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध झाले होते. अनेक रिपोर्ट्समधून हे सांगितले जाते की, सबीर भाटियाला ऐश्वर्या रायशी लग्न करायचं होतं. त्यांनी ताल चित्रपट पाहिल्यानंतर ऐश्वर्याचे तोंडभरून कौतुक केले आणि एका मुलाखतीत तो स्वतः सांगत होता की, “माझ्या इच्छा आहेत की मी ऐश्वर्याशी लग्न करू.” सलमान खान आणि सबीरची भेट 2001 च्या डिसेंबरमध्ये, सबीर भाटिया आणि सलमान खान यांची एका पार्टीमध्ये भेट झाली होती. त्या वेळी ऐश्वर्या राय आणि सबीर भाटिया यांचं प्रेम संबंध जरा चर्चेत आले होते. पार्टीमध्ये एका संभाषणादरम्यान, सलमानने सबीरला विचारले, “मग, तू तो माणूस आहेस ज्याला ऐश्वर्या रायशी लग्न करायचं आहे का?” एक वादग्रस्त घटनेसुद्धा पार्टीतच एका वेळी, सलमानने त्याच्या सिगारेटने सबीरच्या हातावर चटका लावला. त्या वेळी सलमानने क्षमाप्रार्थी होऊन असे सांगितले, “अरेरे, शेवटी ‘ऐश’ तुमच्या हातात आली.” इतर बॉलिवूड कनेक्शन ऐश्वर्याशिवाय, अमिषा पटेल आणि सुष्मिता सेन यांचीही नावे सबीर भाटियाशी जोडली जात होती. मात्र, 9 मार्च 2008 रोजी, सबीरने त्याच्या बालपणीच्या मैत्रिणी तान्या शर्माशी लग्न केले, पण काही वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला.
Tag: Celebrity Gossip
Aamir Khan च्या नव्या प्रेमाची कबुली! गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
Aamir Khan Love Life: 60 व्या वर्षी नव्या प्रेमाची कबुली बॉलिवूड सुपरस्टार Aamir Khan पुन्हा चर्चेत आहे, पण यावेळी त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे! आपल्या वाढदिवशीच त्याने नव्या प्रेमाची कबुली दिली. 60 वर्षीय आमिर खान 46 वर्षीय गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो गौरीची काळजी घेताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण 🔸 एक्सेल एंटरटेनमेंटच्या ऑफिसमध्ये आमिर आणि गौरी स्पॉट🔸 व्हिडीओमध्ये आमिर तिच्यासोबत वेळ घालवताना दिसतोय🔸 सोशल मीडियावर ट्रोलिंगसह चाहते देतायत संमिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि समर्थन 👉 काहींना त्यांची जोडी आवडली, तर काहींनी आमिर खानला ट्रोल केलं.👉 “वय झालं पण वागणुकीत सुधारणा नाही” अशी एका युजरची कमेंट👉 “काल लेकीसाठी रडत होता, आज नव्या गर्लफ्रेंडसोबत!” – आणखी एक ट्रोल👉 “आमिर आयुष्याचा आनंद घेतोय” – चाहतेही समर्थन करत आहेत आमिर खान करणार का तिसरं लग्न? यावर आमिर खान म्हणाला, “मी दोन वेळा लग्न केलं आहे, आता 60 व्या वर्षी लग्न करणं योग्य वाटत नाही. पण पाहू पुढे काय होतं!” कोण आहे गौरी स्प्रॅट? ⭐ गौरी स्प्रॅट विवाहित असून तिचा घटस्फोट झाला आहे⭐ तिला एक मुलगा असून ती बेंगळुरूमध्ये राहते⭐ ती एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते⭐ आमिर आणि गौरी गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात, पण रिलेशनशिपला 1 वर्ष झालं आहे
कोण आहे Gauri Spratt , 3 मुलांचा बाप Amir Khan सोबत करणार लग्न?
बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट Amir Khan वयाच्या 60 व्या वर्षी मोठी घोषणा करत सर्वांना चकित केले आहे. एका महिलेला त्याने आपल्या जोडीदार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे आमिरच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. Gauri Spratt कोण आहे? Gauri Spratt ही मूळची बेंगळुरूची असून ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊस Aamir Khan Films मध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहे. गौरीने हेअरड्रेसिंग क्षेत्रात काम केले आहे आणि तिने लंडनच्या University of Arts मधून Fashion, Styling आणि Photography मध्ये शिक्षण घेतले आहे. तिचे वडील Irish असून आई Tamilian आहे. विशेष म्हणजे गौरीच्या आजोबांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान दिले आहे. गौरीला 6 वर्षांचा एक मुलगा आहे. आमिर आणि गौरीची ओळख फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, आमिर आणि गौरीचा रोमान्स एक वर्षापूर्वी सुरू झाला. मात्र, हे दोघे गेली 25 वर्षे एकमेकांना ओळखतात. आमिरने मुंबईत झालेल्या एका खासगी Pre-Birthday Get-together मध्ये गौरीची ओळख मीडियासोबत करून दिली. मात्र, पापाराझींना गौरीचे फोटो न काढण्याचे आवाहन त्याने केले. आमिर खान याचे वैयक्तिक आयुष्य गौरीला कुटुंबाची मान्यता आमिर खानने सांगितले की, गौरी आता बॉलिवूड सिनेमे पाहण्याची सवय लावत आहे. तसेच त्याच्या कुटुंबीयांनी देखील गौरीला स्वीकारले आहे. त्यामुळे आमिरच्या तिसऱ्या लग्नाची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.