Sameer Wankhede Accuses Shah Rukh Khan Of Defamation
Bollywood आजच्या बातम्या

Sameer Wankhede Vs शाहरुख खान : ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ वाद

Sameer Wankhede Vs Shah Rukh Khan : ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ वाद बॉलिवूड सुपरस्टार Shah Rukh Khan यांचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही वेब सिरीज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. सिरीज प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कारण, माजी एनसीबी (NCB) अधिकारी Sameer Wankhede यांनी या सिरीजविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. वानखेडेंनी केलेले आरोप, त्यांचे म्हणणे आणि या खटल्याचे कायदेशीर परिणाम काय असतील, याचा सविस्तर आढावा घेऊया. मानहानीचा खटला नेमका कोणाविरुद्ध? Sameer Wankhede नी दाखल केलेला खटला थेट Shah Rukh Khan आणि त्यांची पत्नी गौरी खान यांच्या कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स विरुद्ध आहे. Sameer Wankhede यांच्या मते, या सिरीजमधून त्यांच्या प्रतिमेवर आणि कार्यपद्धतीवर गंभीर परिणाम करणाऱ्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. वानखेडेंचे आरोप नुकसानभरपाईची मागणी समीर वानखेडेंनी 2 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. मात्र, ही रक्कम स्वतःकडे न ठेवता ती टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा प्रस्ताव त्यांनी न्यायालयात मांडला आहे. पुन्हा चर्चेत आलेलं आर्यन खान प्रकरण आर्यन खान आणि ड्रग्ज प्रकरण हा विषय आधीच देशभर चर्चेत होता. त्या काळात समीर वानखेडेंनी कारवाई केली होती. आता आर्यन खान दिग्दर्शित सिरीजमुळे पुन्हा एकदा वानखेडे-खान परिवार वादाच्या भोवऱ्यात आले आहेत. कायदेशीर गुंतागुंत या खटल्यात अनेक कायदे गुंतलेले आहेत: जर न्यायालय वानखेडेंच्या बाजूने निर्णय दिला, तर रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्सला मोठा फटका बसू शकतो. सिरीजचं भविष्य काय? न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सिरीजवर बंदी घालावी लागेल का, किंवा त्यातील काही भाग हटवले जातील का, हा प्रश्न उपस्थित होतो. नेटफ्लिक्स आणि रेड चिलीजने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. Wet Drought : ओला दुष्काळ म्हणजे काय? महाराष्ट्र सरकार तो का लागू करत नाही? सविस्तर माहिती.