१७ सप्टेंबरला Beed Railway रेल्वे धावणार. देशाचे पंतप्रधान मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दिवशी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत या बीडकरांच्या स्वप्नांना हिरवा कंदिल दाखवणार. पण बीडमध्ये रेल्वे येणार म्हटल्यावर अनेक राजकीय नावांसोबत एक नाव जोमाने पुढे येत. ते म्हणजे Amol Galdhar यांचं. बीड मधल्या प्रत्येकाला हे नाव परिचित आहे. Beed रेल्वेसाठी संघर्ष बीड मधल्या प्रत्येकानेच केला. अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबत प्रत्येक लोकप्रतिनीधी यासाठी प्रयत्नशील राहीला. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष याचं श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत. अशात एका नावाचा उल्लेख सर्वजण करत आहेत. ते म्हणजे स्व. अमोल गलधर ज्यांचं २०१० मध्ये एका अपघातात निधन झालं. बीड च्या कानाकोपऱ्यातून त्यांनी लोकांना रेल्वेच्या प्रश्नासाठी एकत्र केलं होतं. त्यांना रेल्वेप्रवासाचं महत्व पटवून दिलं. इतकच नाही तर लोकांना आंदोलनासाठी सुद्धा त्यांनी एकत्र केलं. महाराष्ट्रभरातून बीडच्या तरुणांना एकत्र करुन त्यांनी रेल्वे मिळण्यासाठीच्या आंदोलनाला एकत्र आणलं. शेतकरी कुटुंबातला तरुण तडफदार नेता ज्याने त्या काळातील रेल्वे मंत्र्यांनाही सोडलं नाही. प्रत्येकाला भेटून त्यांनी याचं निवेदन दिलं होतं. मगं त्या ममता बॅनर्जी असुद्या नाहीतर मगं लालूप्रसाद यादव. अतिशय आक्रमक आंदोलनासाठी अमोल गलधर हे ओळखले जाऊ लागले होते. एकदा तर त्यांनी ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांचा पुतळा जाळून त्याची राख शासकीय कार्यालयात पाठवली होती. Beed मधल्या आधार प्रतिष्ठानचे ते संस्थापक होते सोबतच राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचं प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं. तरीही त्यांच्या रेल्वेसाठी केलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत एकत्र यायचे. एका आंदोलनादरम्यान अशी परिस्थिती तयार झाली होती की, त्यावेळचे पोलीस अधिक्षख सुवेझ हक यांनी अमोल गलधर यांना अटक केली. त्यांची लोकप्रियता इतकी झाली होती की, अटकेची बातमी ऐकून Beed मध्ये परिस्थीती हाताबाहेर जाऊ लागली होती. त्यांचे कार्यकर्ते सार्वजनीक ठिकाणी दगडफेक करु लागले होते. संपुर्ण बीड बंद होण्याची परिस्थीती झाल्यामुळे शेवटी पोलीसांना अमोल गलधर यांना सगळ्यांसमोर आणावं लागलं. तेव्हा कुठे जाऊन सर्वजण शांत झाले होते. पोखर्णी गावातील परंपरेचा शेकडो वर्षांचा इतिहास | Historic village Pokharni .