Decrease Screen Time भारतामध्ये स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींहून जास्त आहे, आणि त्यातील एक मोठा भाग सोशल मीडियावर तासन् तास घालवतो. परंतु, या अति वापरामुळे मानसिक आरोग्य, उत्पादकता आणि नातेसंबंधांवर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः किशोरवयीन मुलांसाठी ही समस्या गंभीर बनली आहे. आता प्रश्न असा आहे यावर उपाय काय? आजकाल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक लोक फोनमध्ये सतत गुंतलेले असतात. सोशल मीडियाचे अतीवापरामुळे वेळ वाया जातो, ज्यामुळे काम, अभ्यास आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो. याशिवाय, फोनच्या अतिवापरामुळे मानसिक तणाव निर्माण होतात. परंतु काही सोप्या आणि प्रभावी उपाय वापरून आपण स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवू शकतो. १. डिजिटल वेलबीइंग फीचरचा वापर करातुमच्या फोनमधील ‘डिजिटल वेलबीइंग’ किंवा ‘स्क्रीन टाइम’ फीचर वापरा. अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीमध्ये या फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही कोणत्या अॅपवर किती वेळ घालवता याची माहिती मिळते व वेळेची मर्यादा सेट करता येते. २. फोकस मोड आणि ग्रेस्केल मोड वापराफोकस मोड, ग्रेस्केल मोड आणि बेडटाइम मोडसारख्या पर्यायांचा वापर केल्यास विचलन टाळता येतं व झोपेचा वेळही सुधारतो. हे मोड तुम्हाला फोनच्या अति वापरापासून थोडा वेळ दूर राहण्यास मदत करतात. ३. अॅप्सचा वापर कमी करा‘फॉरेस्ट’, ‘जोमो’ आणि ‘ओपल’ सारखी अॅप्स वापरून बघा. हे अॅप्स तुम्हाला सतत सोशल मीडिया अॅप्स उघडण्यापासून अडवतात. ‘फॉरेस्ट’ अॅप वापरत असताना जर तुम्ही फोनपासून दूर राहिलात, तर एक झाड वाढतं – एक प्रकारची मानसिक प्रेरणा! ४. वेळ वाया घालवणारी अॅप्स डिलीट करावेळ वाया घालवणारी अॅप्स डिलीट करणं, त्यांचे शॉर्टकट्स हटवणं किंवा होम स्क्रीनवरून लपवणं हा देखील एक प्रभावी मार्ग आहे. यामुळे तुम्हाला त्या अॅप्सकडे जाण्याची प्रवृत्ती कमी होईल. ५. समुपदेशनाची मदत घ्याजर हे सगळं करूनही तुमचं व्यसन थांबत नसेल, तर समुपदेशक किंवा थेरपिस्टची मदत घ्या. मानसिक आरोग्य तज्ज्ञ या समस्येकडे योग्य पद्धतीने पाहतील आणि योग्य उपाय सुचवतील.घरातील लोकांशी संवाद वाढवा, मैत्रिणींशी प्रत्यक्ष भेटा, छंद जोपासा – यामुळे फोनकडे लक्ष जाणं हळूहळू कमी होईल. आणि लक्षात ठेवा – स्क्रीनशिवायही आयुष्य सुंदर असतं! स्मार्टफोनच्या आहारी गेल्याने तुमच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या टिप्सचा वापर करा आणि एक संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करा.