Brahma Muhurat
Astro धार्मिक राशीभविष्य

हे लोक Brahma Muhurat जन्मलेले असतात खास, Success होण्यासाठी ठेवतात जीवनातील समतोल

प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व असणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, Brahma Muhurat म्हणजेच सकाळी 4 वाजता जन्मलेले लोक विशेष भाग्यवान मानले जातात. या वेळी जन्मलेली व्यक्ती शिस्तप्रिय, आत्मनिर्भर आणि सकारात्मक विचारांची असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक विशिष्ट आकर्षण आणि शक्ती असते जी त्यांना प्रत्येक क्षेत्रात Success मिळवून देतो. या लोकांचा स्वभाव शांत आणि संयमी असतो, पण जेव्हा ते एखाद्या ध्येयाकडे वाटचाल करतात, तेव्हा त्यांना ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण निष्ठेने काम करण्याची क्षमता असते. त्यांची आध्यात्मिकता आणि नैतिक मूल्यांची भावना त्यांना जीवनातील खऱ्या यशाकडे मार्गदर्शन करते. करिअर, नाती, आणि स्वभाव या सर्व गोष्टींमध्ये ते एक योग्य समतोल राखतात. त्यामुळे त्यांच्याकडे जीवनात प्रत्येक गोष्टीत यश मिळवण्याची क्षमता असते. स्वभाव: पहाटे 4 वाजता जन्मलेले लोक अधिक शिस्तप्रिय आणि आत्मविश्वासपूर्ण असतात. त्यांना आपली कामे वेळेवर पूर्ण करण्यावर विश्वास असतो. या व्यक्ती कार्याच्या प्रति जागरूक असतात आणि त्यांना त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असते. ते अत्यंत सकारात्मक आणि आशावादी असतात, ज्यामुळे प्रत्येक परिस्थितीत त्यांना ताण न येता यश मिळवता येते. ते आपल्या वर्तमनाच्या पेक्षा अधिक भविष्यातील यशाकडे लक्ष केंद्रित करतात. करिअर: ब्रह्ममुहूर्तात जन्मलेल्या लोकांचे करिअरही उत्कृष्ट असते. ते नेहमीच कठोर परिश्रम करतात आणि शिस्तीत राहून आपले उद्दीष्ट साधतात. त्यांना दृष्टीकोनात विस्तृतता असते, ज्यामुळे ते अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांना नेतृत्वाची भूमिका मिळवता येते. तसेच, हे लोक आपल्या नोकरीत अथवा व्यवसायात उत्तम कामगिरी सादर करतांना दिसतात. नाती आणि प्रेम जीवन: हे लोक प्रेम आणि नातेसंबंधात देखील समतोल राखतात. ते आपल्या जोडीदाराशी आणि कुटुंबाशी चांगले संबंध ठेवतात. ते आपल्या नात्यांमध्ये विश्वास ठेवतात आणि नेहमीच पारदर्शक राहतात. त्यांचा स्वभाव संयमी आणि शांत असतो, ज्यामुळे त्यांना तणावपूर्ण परिस्थितीत देखील शांत राहता येते. यामुळे नात्यांमध्ये संघर्ष कमी होतात आणि त्यांचे प्रेम जीवन सुखी आणि समाधानकारक असते.

Ram Navami
धार्मिक राशीभविष्य

Shri Ram Navami च्या दिवशी घरात लावा हे चमत्कारिक चित्र! सुख-समृद्धी नांदेल, मिळेल यश

Ram Navami Vastu Shastra हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते. यानुसार, घरात योग्य ठिकाणी देवी-देवतेची चित्रे लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनात सुख, समृद्धी, आणि यश प्राप्त होते. मात्र, प्रत्येक चित्र योग्य दिशेला लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर चित्र चुकीच्या दिशेला लावले तर जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. श्रीरामाचे चित्र, जो दैवी शक्तीचा प्रतीक आहे, योग्य दिशेला लावल्यास घरात सुख, समृद्धी, आणि यश येते. रामनवमी – शुभ दिनरामनवमी हा भगवान श्रीरामाचा जन्मदिवस आहे, जो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो. या वर्षी रामनवमी 6 एप्रिल रोजी येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचे चित्र घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. राम दरबाराचे चित्र लावल्याने घरात सकारत्मकता येते आणि सौभाग्य वाढते. कुठे लावावे श्रीरामाचे चित्र?वास्तुशास्त्रानुसार, श्रीराम दरबाराचे चित्र घराच्या पूर्व दिशेला लावणे सर्वोत्तम आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख-शांतीचा प्रवाह कायम राहतो. तसेच, घरातील सर्व वास्तु दोष नष्ट होतात. हे चित्र पूजागृहाच्या भिंतीवर देखील लावता येते, ज्यामुळे आपला घरातील वातावरण पवित्र आणि सुखी राहतो. राम दरबाराची स्थापना का करावी?श्रीराम दरबाराची स्थापना आपल्या घरात केल्याने आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. नियमित पूजा केल्याने घरात सौभाग्य आणि प्रगती मिळते. कुटुंबातील सदस्यांमधील भांडणं कमी होतात आणि एकमेकांमध्ये प्रेम वाढते. हे चित्र घरातील वातावरण स्वच्छ ठेवते आणि प्रत्येक सदस्याच्या जीवनात यश व समृद्धी आणते. विशेषत: रामनवमीच्या दिवशी श्रीरामाचे चित्र घरात लावणे तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येईल

Vitthal Rukmini
Trending धार्मिक

Vitthal Rukmini चंदन-उटी पूजा: उन्हाळ्यात थंडावा देणारी परंपरा

उन्हाळ्याच्या महिन्यांत पंढरपूरमधील Vitthal Rukmini चंदन-उटी पूजा विशेष महत्त्वाची आहे. प्रत्येक वर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत ही पूजा केली जाते. या पारंपरिक पूजा अंतर्गत, खास म्हैसूरहून उच्च दर्जाचे चंदन मागवले जाते. विठोबाला आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिमांना चंदनाचा लेप लावण्यात येतो, ज्यामुळे उष्णतेपासून त्यांना थंडावा मिळावा आणि भक्तांना शांतता आणि शांतीचा अनुभव होईल. चंदन उटी पूजेची परंपरा पंढरपूर मंदिरात शतकांपासून चालत आहे. ही पूजा सूर्याच्या तीव्र उष्णतेपासून देवतेच्या संरक्षणासाठी केली जाते. भक्तांचा विश्वास आहे की देवतेदेखील उष्णतेच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी चंदनाचा लेप घेतात. या पद्धतीला अनुसरून, पंढरपूर मंदिराच्या परिसरात उन्हाळ्याच्या काळात विशेष उत्साह दिसतो. उन्हाळ्याच्या गडद उकाड्यापासून विठ्ठल-रुक्मिणी मातेचे संरक्षण करण्यासाठी पंढरपूरमधील चंदन-उटी पूजा महत्त्वाची परंपरा आहे. चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत रोज चंदनाचा लेप देवाच्या शरीरावर लावला जातो. यासाठी कर्नाटकमधील म्हैसूरहून उच्च दर्जाचे चंदन मागवले जाते. या पूजा प्रक्रियेत चंदनाच्या शीतलतेमुळे देवतेला थंडावा मिळतो आणि त्यांच्या रूपाची सुंदरता खुलते. चंदन उटी पूजेचा महत्वाचा भाग म्हणजे रोज दीड किलो चंदन उगाळून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या शरीरावर लेप लावला जातो.

Jejuri
धार्मिक राशीभविष्य

Jejuri ला तर जावंच लागतंय! लग्न कार्यावेळी देवदर्शन का करतात?

सध्या लग्नसराई जोरात चालू आहे! अगदी सुपारी फोडणे, केळवण ते हळद उतरवण्याचा विधी सगळ्याचे रोज नवनवीन व्हिडिओस पहायला मिळत आहेत. ज्यातून लग्न कार्यावेळी किती वेगवेगळ्या प्रथा- परंपरा पाळल्या जातात हे आपल्याला पहायला मिळतंय. ज्यातील काही लग्नाच्या अगोदरच्या आहेत तर काही लग्ना नंतरच्या! पण यातील एक गोष्ट लग्नाआधी सुद्धा करावी लागते आणि लग्नानंतरही! ती म्हणजे देवदर्शन! लग्नाआधी देवदर्शन केल जातं, लग्नानंतर देवदर्शन केलं जात आणि लग्नानंतर Jejuri च्या खंडेरायाचे दर्शन तर हमखास घेतलं जात! केळवण, सुपारी फोडणे अश्या काही प्रथा लग्नाआधीच्या असतात, तर हळद उतरवणे, जागरण गोंधळ अश्या गोष्टी लग्नानंतर केल्या जातात. पण देवदर्शन लग्नाआधी व लग्नानंतर दोन्ही वेळेस केलं जात. ज्यात कुटुंबाचे कुलदैवत, कुलदैवता, वधू व वर राहतं असलेल्या ठिकाणचे ग्रामदैवत, ग्रामदेवी, तसेच इतर महत्वाची व आसपासची देवस्थाने यांचे दर्शन घेतले जाते. लग्नाआधी वधू व वर त्यांच्या त्यांच्या परिवारासोबत हे देवदर्शन करतात. तर लग्न झाल्यावर नव विवाहित जोडपं एकत्र देवदर्शन करत. पण का? सगळ्यात पाहिलं लग्नाआधी देवदर्शन का केलं जात?सगळ्यात पाहिलं लग्नाआधी देवदर्शन का केलं जात? ते पाहुयात. लग्नाआधी केलं जाणार देव दर्शन वधू व वर दोघेही त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांसोबत करतात. यावेळी देवाचे मनोभावे दर्शन घेऊन देवांना लग्नाची पत्रिका दिले जाते, घरात होणाऱ्या शुभकार्याचे आमंत्रण दिलं जात. तर देवांना लग्नपत्रिका दिल्यानंतरच मग इतर नातेवाइकांना, पै पाहुण्यांना व मित्रमंडळींना पत्रिका देऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले जाते. तसेच यावेळी आमच्या कुटुंबात योजलेले लग्नकार्य कोणत्याही विघ्नाशिवाय सुरळीतपने पार पडावे अशी प्रार्थना देखील केली जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर होऊ घातलेल्या लग्नाला देवतांचा आशिर्वाद मिळावा व सगळ्यागोष्टी निर्विघ्न पार पडाव्यात म्हणून लग्नाआधी देवदर्शन केल जात. लग्न झाल्यावर देवदर्शन केल जात? लग्न झाल्यावर पुन्हा एकदा देवदर्शन केल जात. यावेळी नवविवाहित वधू व वर एकत्र जोडीने देवदर्शन करतात. जेणेकरून त्यांच्या लग्नाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा व त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखकर व्हावं. तसेच लग्न कार्य सुरळीत व निर्विन्घ पार पडले म्हणून यावेळी देवाचे आभार देखील मानले जातात. यासोबतच लग्नानंतर देवदर्शन करण्याचा मुख्य हेतू म्हणजे नववधूला तिच्या नव्या कुटुंबाच्या कुलदेवतांची माहिती करून देणे. यावेळी सासरची मंडळी खासकरून सासू बाई नव वधूला तिच्या नव्या घराचे कुलदैवत कुलदेवता यांची ओळख करून देतात, त्यांचे महात्म्य, त्यांच्या पूजेची विधी याबद्दल माहिती देतात. तसेच जर कुठल्याहि जोडप्याने लग्नानंतर देव दर्शन न करता तशीच त्यांच्या संसाराला जर सुरवात केली तर त्यांच्या संसारात अर्थात वैवाहिक जीवनात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असा देखील अनेकांचा समज आहे. त्यामुळे नादाम्पत्याचं वैवाहिक जेवण आनंददायी व्हावं यासाठी अनेकजण न चुकता लग्नानंतर देवदर्शन करतात. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे लग्नानंतर जेजुरीला का जातात? कोणत्याही देवस्थानाला गेले, नाही गेले, खंडोबा त्यांच कुलदैवत असू न असू तरीसुद्धा जेजुरीला अनेक जोडपी जातातच. ज्याची दोन महत्वाची कारणे सांगितली जातात. पाहिलं कारण म्हणजे एकतर जेजुरीचा खंडेराया हा महाराष्ट्रातील अनेक कुटुबांच कुलदैवत आहे, त्यामुळे कुलदैवताचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेकजण जेजुरीला जातात. पण Jejuriला तर जावंच लागतंय! लग्न कार्यावेळी देवदर्शन का करतात?चा खंडेराया कुटुंबाचे कुलदैवत नसताना देखील अनेक जण जेजुरीला जातात. कारण जेजुरीचा खंडेराया हा आदिदेव असलेल्या शिव शंकर यांचा अवतार आहे तसेच म्हाळसा देवी या आदिशक्ती पार्वती देवीच्या अवतार आहेत, त्यामुळे शिवपार्वती सारखा नवजोडप्याचा संसार देखील सुखाचा व्हावा व त्यांना आदिदेव महादेव व माता पार्वती यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून कुलदैवत असो वा नसो अनेकजण जेजुरीला न चुकता जातात. तर ज्यांना जेजुरीला यायला जमत नाही ते कोल्हापूरच्या ज्योतिबाला अथवा त्यांच्या जवळच्या मार्तंड मल्हारीच्या मंदिरात जाऊन त्याचे आशीर्वाद घेतात. आता या पारंपरिक आणि पौराणिक कारणांसोबत लग्नानंतर जेजुरीला जाण्याचं एक डिजिटल कारण सुद्धा आहे. ते म्हणजे रील्स बनवणं. लग्न झाल्यावर बाकी काही करो वा न करो जेजुरीला जाऊन रील्स बनवणं मस्ट झालाय. त्यामुळे भंडारा उधळतानाची ती एक रील बनवायची म्हणून देखील अलीकडच्या काळात अनेकजण लग्नानंतर जेजुरीला जात आहेत.