मूलांक 1 म्हणजे काय?
मूलांक 1 असलेल्या मुली म्हणजे ज्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या असतात. या संख्येचा स्वामी सूर्य असल्यामुळे या मुली स्वाभिमानी, आत्मविश्वासपूर्ण आणि नेतृत्वगुण असलेल्या असतात.
स्वभाव वैशिष्ट्ये
स्वतंत्र आणि कणखर: कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही.
नेतृत्वगुण: पुढे राहून निर्णय घेणे आणि स्वतःला सिद्ध करणे आवडते.
दृढनिश्चयी: एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करायची जिद्द असते.
प्रभावी व्यक्तिमत्त्व: गर्दीतही सहज लक्ष वेधून घेतात.
नातेसंबंधांतील स्वभाव
जो हुकूम मेरे आका! – मूलांक 1 च्या मुली त्यांच्या जोडीदारावर वर्चस्व गाजवायला आवडतात.
त्यांना खोटेपणा आणि कृत्रिमपणा सहन होत नाही, त्या नेहमी स्पष्टवक्त्या असतात.
प्रेमात पडल्यावर पूर्ण समर्पित होतात, पण त्याच वेळी जोडीदाराकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा असते.
त्यांच्या जोडीदाराने त्यांचे सगळे ऐकावे, आदर करावा, त्यांना महत्त्व द्यावे अशी त्यांची इच्छा असते.
जर जोडीदार त्यांच्याशी असहमत असेल, तर त्या सहज झुकत नाहीत.
करिअर आणि यशस्वी व्यवसाय
प्रभावी नेतृत्वगुण असल्यामुळे प्रशासन, मीडिया, राजकारण आणि उद्योजकता यामध्ये मोठे यश मिळवतात.
पैशाची उत्तम समज असल्याने व्यवसायातही चांगली प्रगती करतात.
नवीन गोष्टी शिकायला आवडतात आणि काहीतरी वेगळं करून दाखवतात.